अकोल्यात १८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:57 PM2019-05-18T13:57:09+5:302019-05-18T14:02:59+5:30

आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

Food poisoning to 18 food laborers at karla village | अकोल्यात १८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

अकोल्यात १८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

googlenewsNext

आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम सुरू आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील अटाळी व पातुर तालुक्यातील तुलंगा येथील २६ मजूर काम करण्यासाठी कारला या गावांमध्ये आले होते. आज सकाळी अचानक यातील काही लोकांना मळमळ,उलट्या,पोट दुखणे,संडास असा त्रास होत होता त्यामुळे त्यांनी सकाळीच जवळच असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे धाव घेऊन उप्चचार घेतले. उपचार दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव येथे उपचार सुरू आहे .त्यामध्ये अविनाश भोसले सुनील चव्हाण अरुण पवार शालू भोसले दिव्या चव्हाण पल्लवी चव्हाण दिलीप पवार वैजांती भोसले प्रवीण काळे खडकाळ सिंग पवार जनाबाई पवार देव चव्हाण साहिल भोसले महेश भोसले वैशाली भोसले यांचा समावेश आहे. यामध्ये काही महिला व लहान मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम यांनी सांगितले. दरम्यान बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुट्टी असूनही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम हे प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. त्यामुळे शेतमजुरांना योग्य उपचार मिळाला.यावेळी डॉक्टरांना मदतीसाठी फार्मासिस्ट संदीप लांडगे परिचारिका इंगळे साबळे आदि कर्मचारी उपस्थित होते

अटाळी व तुलंगा येथील १८ मजूर यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना उलट्या, संडास व डोकेदुखी होती. त्यांच्यावर आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.
- डॉ. फैजान असलम, वैद्यकीय अधिकारी, आलेगाव.

 

Web Title: Food poisoning to 18 food laborers at karla village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.