वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा! -  पालकमंत्र्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 03:32 PM2019-02-10T15:32:51+5:302019-02-10T15:32:56+5:30

अकोला: ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी, वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले.

 Fix the complaints of electricity consumers promptly! - Ranjit patil | वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा! -  पालकमंत्र्यांचे निर्देश 

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा! -  पालकमंत्र्यांचे निर्देश 

googlenewsNext

अकोला: ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी, वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले.
शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आयोजित जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी आमदार हरीश पिंपळे, महावितरणचेअकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह समितीचे सदस्य व महावितरणचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वीज पुरवठ्यासंदर्भात समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन समस्या जाणून घेण्याच्या सूचना देत, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

वीज बिलाच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा!
वीज बिलासंदर्भात बहुतांश ग्राहकांच्या तक्रारी असतात, त्या प्राधान्याने सोडवून, ग्राहकांना सरासरी वीज बिल न देता, मीटर रिडिंगप्रमाणे वेळेवर आणि अचूक बिल देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी महावितरणला दिले. पाणी पुरवठा योजनांसाठी सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे सांगत मूर्तिजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांना सौभाग्य योजनेतून वीज जोडणी तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या.

नुकसान भरपाईचा अहवाल बुधवारपर्यंत सादर करा!
विजेमुळे होणाºया नुकसान भरपाईचा अहवाल येत्या बुधवारपर्यंत सादर करण्याचे सांगत अपघातप्रवण स्थळांच्या कामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शेतकºयांच्या दृष्टीने सौर कृषी पंप योजनेसंदर्भात तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देत, अवैध वीज जोडणीसंदर्भात कारवाई करून ग्राहकांना सौजन्याची वागणूक देण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

 

Web Title:  Fix the complaints of electricity consumers promptly! - Ranjit patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.