Five seriously injured in a car crash in Akola | कार अपघातात अकोल्यातील दुबे परिवारातील पाच गंभीर 
कार अपघातात अकोल्यातील दुबे परिवारातील पाच गंभीर 

ठळक मुद्देअंत्यविधी उरकून परतणार्‍या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने दिली धडक अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अंत्यविधी उरकून परतणार्‍या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने धडक देवून झालेल्या अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी झाले. ही घटना अमरावती-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाघूड फाट्यानजिक (मलकापूर जि.बुलडाणा) दुपारी १.३0 वाजता घडली. यात एक महिला अत्यवस्थ झाल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. 
  अकोला येथील राधाकृष्ण प्लॉटमधील रहिवाशी दुबे कुटूंबीय बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील टेंभी माकोडी येथे अंत्यविधीसाठी टाटा नॅनो कार क्र.एमएच-पी-४0६१ ने आले होते. अकोला येथे परत जात असतांना दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडून मुंबईकडे भरधाव जाणारा ट्रक क्र.एमएच३४-ए-५३३६ कारवर आदळला. 
त्यात नॅनो चालक रमेश बिहारीलाल दुबे (वय ५८), मोहनप्रसाद बिहारीलाल दुबे (वय ५४), सौ.संगीता मोहनप्रसाद दुबे (वय ४५), अनिता रमेश दुबे (वय ५१), सौ.गिता अनिल दुबे असे पाच जण गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी अनिता दुबे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतरांवर डॉ.कोलते हॉस्पीटलात उपचार करण्यात आले. 
अपघातातील रमेश दुबे हे अकोला वनविभागाचे रेंजर ऑफिसर असून मोहनप्रसाद दुबे हे अकोला पोलिस अधिक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.  


Web Title: Five seriously injured in a car crash in Akola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.