पाच जिल्ह्यांतील वृक्ष लागवड एक कोटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:48 PM2018-07-22T12:48:42+5:302018-07-22T12:51:04+5:30

अकोला : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १९ जुलैपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील वृक्ष लागवड १ कोटी १० लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे.

Five-district tree planting at one crore! | पाच जिल्ह्यांतील वृक्ष लागवड एक कोटीवर!

पाच जिल्ह्यांतील वृक्ष लागवड एक कोटीवर!

Next
ठळक मुद्देराज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.पाचही जिल्ह्यांत १ कोटी ५८ लाख ५२ हजार ६३९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. पाचही जिल्ह्यांत १ कोटी १० लाख ५४ हजार ८०९ वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

- संतोष येलकर 
अकोला : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १९ जुलैपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील वृक्ष लागवड १ कोटी १० लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे.
वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत १ कोटी ५८ लाख ५२ हजार ६३९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, उद्दिष्टाच्या तुलनेत १९ जुलैपर्यंत पाचही जिल्ह्यांत १ कोटी १० लाख ५४ हजार ८०९ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार असून, तोपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याची स्थिती आहे.

जिल्हानिहाय करण्यात आलेली अशी आहे वृक्ष लागवड!
जिल्हा                               लागवड

अमरावती                        २१००८७७
अकोला                            १६२०३३४
बुलडाणा                          १९७४९३०
वाशिम                            ९८४८२८
यवतमाळ                       ४३७३८४०
...................................................
एकूण                           ११०५४८०९

वृक्ष लागवडीसाठी उरले दहा दिवस!
वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ३१ या कालावधीत वृक्ष लागवड करावयाची आहे. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता दहा दिवसांचा कालावधी उरला आहे.

 

Web Title: Five-district tree planting at one crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.