दहा वर्षात पहिल्यांदाच उमलले सुरणचे फूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:18 PM2019-05-08T13:18:51+5:302019-05-08T13:21:05+5:30

दुर्मिळ असे सुरण फूल तब्बल दहा वर्षांनी गीता नगरातील प्रा. जे.आर. शर्मा यांच्या घरातील अंगणात उमलले आहे.

For the first time in 10 years, Suran flower flurish in Akola |  दहा वर्षात पहिल्यांदाच उमलले सुरणचे फूल!

 दहा वर्षात पहिल्यांदाच उमलले सुरणचे फूल!

googlenewsNext

- नितीन गव्हाळे

अकोला: बाजारात गेल्यावर सुरणची भाजी सहज मिळते. सुरण हा जमिनीतील कंद आहे. त्याला मराठीत सुरण तर हिंदीमध्ये जमिकंद म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव एमआफोफेलस आहे. अशा कंदाचे दुर्मिळ असे फूल तब्बल दहा वर्षांनी गीता नगरातील प्रा. जे.आर. शर्मा यांच्या घरातील अंगणात उमलले आहे. सुरण फूल जगात सर्वात मोठे मानले जाते. या फुलाला मृत शरीरासारखी दुर्गंधी येत असल्याचे वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात.
सुरण ही वनस्पतीच्या (कंद) २00 प्रजाती आहेत. ही वनस्पती आशिया, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया आणि समुद्री बेटांवर आढळून येते. अशी वनस्पती रालतो विज्ञान महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्रा. जे.आर. शर्मा यांनी त्यांच्या गीता नगरातील घराच्या अंगणात १५ वर्षांपूर्वी लावली. दोन दिवसांपूर्वी या वनस्पतीवर मोठे फूल उमलले. त्यांना हे अनोख फूल पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी सहकारी वनस्पतीशास्त्राचे प्रा. अभय भंडारी यांच्या संपर्क साधून सुरण फुलाची माहिती जाणून घेतली. सुरणचे कंद हे भूमिगत असतात. त्याला दुष्काळाचे अन्नसुद्धा म्हटल्या जाते. या वनस्पतीचे फूल (इनफ्लोअरसेन्स) जगात सर्वात मोठे आहे. त्याची उंची २.५ मीटर तर रुंदी १.५ मीटरपर्यंत असू शकते. या फुलाच्या टोकावर तापमान मनुष्याच्या शरीराच्या तापमानाएवढे असते. सडलेल्या मांसाचा जशी दुर्गंधी येते. तशी दुर्गंधी या फुलालासुद्धा येते. त्यामुळे या फुलावर किडे येऊन परागण करतात. दुर्गंधीमुळे या फुलाकडे अनेक कीटक आकर्षित होतात.

शिकागोतील गार्डनमध्ये उमलले होते फूल!
सुरणचे सर्वात मोठे ४ फूट उंचीचे फूल शिकागो बॉटेनिकल गार्डनमध्ये २९ सप्टेंबर २0१५ मध्ये उमलले होते. त्यावेळी हे अनोखे फूल पाहण्यासाठी २0 हजार लोकांनी गार्डनमध्ये रांग लावली होती. त्यामुळे शिकागो बॉटनिकल गार्डन ३0 सप्टेंबरच्या रात्री २ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते.

इंग्लंडमध्ये आढळले होते फूल
सुरणचे सर्वात मोठे कंद रॉयल बॉटनिकल गार्डन एडीनबर्ग(इंग्लंड) मध्ये आढळून आले होते. त्याचे वजन १५३.७ किलो एवढे प्रचंड होते.


सुरण किंवा जमिकंदाचे फूल दहा ते अकरा वर्षातून एकदा उमलते. याला एकच पान असते. त्याचा व्यास ६ मीटरपर्यंत असतो. त्यात अनेक लहान पाने जोडलेली असतात. या फुलाला मृत शरीरासारखी दुर्गंधी येते. त्यामुळे कीटक या फुलाकडे आकर्षित होतात. शिकागो बॉटनिकल गार्डनमध्ये उमललेल्या दुर्मिळ फुलाला पाहण्यासाठी २0 हजार लोकांनी रांगा लावल्या होत्या.
-अभय भंडारी,
सेवानिवृत्त प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र

 

 

Web Title: For the first time in 10 years, Suran flower flurish in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला