आधी लग्न ‘लोकशाही’चे : मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:05 AM2019-04-18T11:05:33+5:302019-04-18T11:08:44+5:30

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील दोन नवरदेवांनी लग्नाला जाण्याआधी मतदान केले.

First marriage of 'Democracy':Grooms voting first, then marriage | आधी लग्न ‘लोकशाही’चे : मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर

आधी लग्न ‘लोकशाही’चे : मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर

Next

अकोला : लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धूम सुरु असून, अकोलाबुलडाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची जागरुकता दिसून येत असून, स्वत:च्या लग्नाला जाण्याआधी नवरदेव मतदान करताना दिसून येत आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील दोन नवरदेवांनी लग्नाला जाण्याआधी मतदान केले. तर बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव येथील एका नवरदेवाने हाच कित्ता गिरवित आधी लग्न ‘लोकशाही’चे मग स्वत:चे असा संदेश दिला.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील उमेश रामचंद्र खुमकर या नवरदेवाचे लग्न बोदवड जिल्हा जळगाव खान्देश येथे जाणार असल्याने दूरचा प्रवास म्हणून सोबत जाणाºया शंभर वºहाडी मंडळीने नवरदेवा सोबत आपल्याला लोकशाहीने दिलेला मतदान अधिकार बजावला. त्यांनी आधी लग्न लोकशाहीचे ठरवून मतदान केल्याने उपस्थित निवडणुक कर्मचाऱ्यांनी नवरदेवाला शुभेच्छा दिल्या.


बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील नवरदेव योगेश नागळे याने लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच त्याने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वºहाडी मंडळींनीही आधी मतदान केले व नंतरच लग्नाला रवाना झाले.

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथून जवळच असलेल्या ग्राम उमरा देशमुख येथील नवरदेवाने प्रथम मतदानाचा हक्क बजावला. उमरा देशमुख येथील वसंतराव देशमुख यांचा मुलगा अभिमन्यू याचा दि. 18एप्रिलला सुभाषराव देशमुख रा. कोढूर जि. हिंगोली येथील रेखा हिच्या शी ठरला व ठरल्याप्रमाणे नवरदेवाने प्रथम लोकसभेच्या मतदानाचा हक्क बजावला व नंतर नवरदेव लग्नासाठी रवाना झाला.

 

 

Web Title: First marriage of 'Democracy':Grooms voting first, then marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.