अकोल्यातील मोहम्मद अली रोडवरील दुकानाला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:04 PM2017-12-19T22:04:50+5:302017-12-19T22:19:29+5:30

अकोला : मोहम्मद अली रोडवरील एका चप्पल-जोडे दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Fire at the shop on Mohammad Ali road in Akola | अकोल्यातील मोहम्मद अली रोडवरील दुकानाला आग!

अकोल्यातील मोहम्मद अली रोडवरील दुकानाला आग!

Next
ठळक मुद्देचप्पल-जोड्याचे दुकान : मंगळवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान लागली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आग : दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोहम्मद अली रोडवरील एका चप्पल-जोडे दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद अली रोडवरील मो. युनूस अ. सत्तार लाखानी यांचे शु-प्लाझा नावाने जोडे व चपलांचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर दुकानातील साहित्याला आग लागली. या आगीची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाने तातडीने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत या आगीत लाखो रुपयांची हानी झाली.

Web Title: Fire at the shop on Mohammad Ali road in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.