ठळक मुद्देअज्ञात इसमाने आग लावल्याची माहिती२0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड : येथील मिलिंद सुखदेव कांबळे यांच्या राहत्या घराला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली. या आगीत शालेय पुस्तके, धान्य कपडे आदींसह इतर साहित्य जळाल्याने कांबळे यांचे २0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 
मिलिंद कांबळे यांचे कुटुंब बाहेरगावी रोजगारासाठी गेले असून, त्यांची मुले शिक्षण घेत असल्याने गावी राहत होते. ९ नोव्हेंबर रोजी मिलिंद कांबळे शेजारच्या घरी गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराच्या खिडकीतून मशाल फेकून आग लावली, तसेच अंधाराचा फायदा घेऊन रेल्वे लाइनच्या दिशेने पळ काढला. घराला लागलेली आग नागरिकांच्या मदतीने विझविण्यात आली. यामध्ये मुलांचे शालेय पुस्तके, दस्तावेज, प्रमाणपत्र आदींसह धान्य जळाले. घटनेची माहिती मिळताच बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनचे बिट जमादार राजाभाऊ बचे यांनी पंचनामा करून नोंद घेतली. तलाठी एन.जी. पवार, शशिकांत जगताप, श्रीकृष्ण मांगाडे आदींनी पाहणी करून नुकसानीचा अहवाल पाठविला.