मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:26 PM2018-03-21T16:26:24+5:302018-03-21T16:26:24+5:30

अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला.

Financial Assistant for morna mission in akola | मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत

मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत

Next
ठळक मुद्देस्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा, शोष खडडे या कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही मोर्णाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.


अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. मंगळवारी नियोजन सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी या कर्मचाऱ्यां नी धनादेश दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व अन्य मान्यवर उपस्थित होते. मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा, शोष खडडे या कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक विजय खेडकर, सहायक प्रमोद ठाकूर, वाहनचालक किशोर तायडे, डिगांबर ठग, सुरक्षा रक्षक सिध्दु जंजाळ, प्रवीण शिरसाट, नारायण देवळे, महिला पोलीस संध्या अरखराव, सेवक मधुकर कुमरे, जी.पी. भारती, निलेश गाडगे, साऊंड रेकोर्डिस्ट रोहीत जांभे या कर्मचाºयांनी मोर्णा स्वच्छता मिशनसाठी निधी दिला आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला १३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोणार्चा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही मोर्णाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Financial Assistant for morna mission in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.