भारनियमनाविरोधात जुने शहरातील महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:29 AM2017-10-07T02:29:45+5:302017-10-07T02:30:05+5:30

अकोला : अकोला शहर उपविभागांतर्गत येणार्‍या जुने शहरातही दररोज सहा ते आठ तास भारनियमन होत असून, त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावरही होत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके व नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मोर्चा काढून आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात आपल्या व्यथा मांडल्या. 

Female aggressor in old city against weightlifting | भारनियमनाविरोधात जुने शहरातील महिला आक्रमक

भारनियमनाविरोधात जुने शहरातील महिला आक्रमक

Next
ठळक मुद्देआमदार बाजोरियांकडे मांडल्या व्यथा भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला शहर उपविभागांतर्गत येणार्‍या जुने शहरातही दररोज सहा ते आठ तास भारनियमन होत असून, त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावरही होत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके व नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मोर्चा काढून आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात आपल्या व्यथा मांडल्या. 
कोळशाचा तुटवडा आणि बेताल नियोजनामुळे महावितरणवर सध्या राज्यभर भारनियमन करण्याची नामुष्की ओढवली आहे. महावितरणच्या अकोला मंडळातही सर्वच फिडरवर ‘ग्रुप’निहाय शहरी व ग्रामीण भागात किमान सहा ते सव्वानऊ तास वीज गायब राहत आहे. जिल्हय़ातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, जी १, जी २ व जी ३ या ग्रुपनुसार भारनियमनाचे तास ठरविण्यात आले आहे. याचा फटका प्रामुख्याने ग्रामीण भागाला बसत असला, तर जुने शहरातील अनेक भागातही आठ ते सहा तास वीज गायब राहत आहे. सणासुदीच्या काळात तासन्तास वीज गायब राहत असल्याने नागरिकांमध्ये रोषाची भावना आहे. वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे पाणीपुरवठय़ावरही त्याचा परिणाम होत आहे. शहरात सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी पुरवठय़ाच्या वेळेतच वीज गायब राहत असल्याने नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शुक्रवारी आमदार गोपीकिशन यांचे कार्यालय गाठून त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. पाणीपुरवठय़ाच्या वेळेत भारनियमन होऊ नये, अशी रास्त मागणी महिलांनी लावून धरली. 
नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार बाजोरिया यांनी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके व शहर विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मानकर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी त्यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून महावितरणच्या अधिकार्‍यांशी त्यांचे बोलणे करून दिले. 
भारनियमनाची वेळ बदलून देण्यासंदर्भात महावितरण मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना यावेळी ऊर्जामंत्र्यांनी अधिकार्‍यांना केल्या.  मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी अतुल पवनीकर, सागर भारुका, नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

चक्क सहा ते आठ तास अघोषित भारनियमनामुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. मोर्चेकरी महिला व महावितरणच्या अधिकार्‍यांसमक्ष ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. महिला वर्गाला होणारा त्रास लक्षात घेता भारनियमनाच्या वेळेत बदल करण्यासोबतच संपूर्ण शहरात एकाच वेळी भारनियमन करण्याची मागणी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. महावितरणने वेळेत बदल न केल्यास आंदोलनाचा मार्ग खुला आहे. 
- गोपीकिशन बाजोरिया, आमदार 

Web Title: Female aggressor in old city against weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.