पीक विम्यासाठी शेतकºयांची पायपीट!

By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:29 AM2017-07-26T02:29:40+5:302017-07-26T02:30:59+5:30

Farmer's footprint for crop insurance | पीक विम्यासाठी शेतकºयांची पायपीट!

पीक विम्यासाठी शेतकºयांची पायपीट!

Next
ठळक मुद्देतलाठी दाखला मिळेना, बँक विमा घेईनाआॅनलाइनमध्येही अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
व्याळा : ‘निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात’ हे घोषवाक्य घेऊन प्रधानमंत्री विमा योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत असल्याचे चित्र आहे. विमा काढण्यासाठी शेतकºयांनी अडथळ्याची शर्यत पार करावी लगात आहे. जिल्ह्यातील अनेक तलाठी दाखले देत नसल्याचे सांगत आहेत, तर बँकांनी २०१७ मध्ये कर्ज घेणाºया शेतकºयांचाच विमा प्रस्ताव स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. ३१ जुलै ही मुदत असताना आॅनलाइन अर्ज भरण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात प्रथमच पीक विम्यासाठी २८२ केंद्रांवरून आॅनलाइन अर्ज भरण्यात येत आहेत. या पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै असताना विमा काढणाºया कंपनीचे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे एक विमा काढण्यासाठी एक ते दोन तास लागत आहे. त्यातही आॅनलाइनमध्ये आधार नंबरवरून केवायसी केल्या जात आहे. अनेक शेतकºयांचे आधार कार्ड अद्ययावत नसल्याने विमा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जदार, बिगर कर्जदार शेतकºयांचा विमा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले आहे; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेसह नॅशनल बँकांनी वेगवेगळे अर्थ काढून आमच्याकडे स्कॅनर नाही, थंब मशीन नाही, आम्हाला आदेश नाही, असे सांगत विमा प्रस्ताव घेणे थांबवले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी अजूनही विमा काढलेला नाही. त्यातच शेवटची तारीख ३१ जुलै असल्याने विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन विमा काढण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Farmer's footprint for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.