farmer son commit suside at Sindkhed | सिंदखेड येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
सिंदखेड येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

कापशी रोड (जि. अकोला): येथून जवळच असलेले सिंदखेड ( मोरेश्वर) येथील एका शेतकऱ्याच्या तरुण मुलाने मंगळवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू लहुजी वानखडे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सिंदखेड मोरेश्वर येथील शेतकरी लहुजी वानखडे याचे पुत्र बाळू लहुजी वानखडे यांनी त्याच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला पहाटे तीन वाजताचे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिवस उजाडल्यावर उघडकीस आली. नापिकी व बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. बाळू यांच्या बहिणीचे लग्न ठरलेले आहे. वडीलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना, लग्नाचा खर्च कसा करावा, या विवंचनेतच बाळू यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.ा घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.


Web Title: farmer son commit suside at Sindkhed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.