थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 03:30 PM2019-06-25T15:30:04+5:302019-06-25T15:34:36+5:30

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही.

Farmer not get crop loan, ran to private money lenders | थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

Next
ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही.थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

- संतोष येलकर

अकोला: शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही थकबाकीदार शेतकºयांची अशीच परिस्थिती आहे.
३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय गत २८ जून २०१७ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. तसेच थकबाकीदार संबंधित शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा करीत, संबंधित थकबाकीदार शेतकºयांकडून पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे गत दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळू शकत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय उरला नाही. तोंडावर आलेल्या खरीप पेरणीसह गरजेनुसार इतर खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’साठी शेतकरी पैसा आणणार कोठून ?
दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही. थकबाकीदार शेतकरी एकरकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरतात; परंतु दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नसल्याने, थकबाकीदार शेतकरी ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पैसा आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अकोला जिल्ह्यात असे आहेत थकबाकीदार शेतकरी!
वर्ष                         शेतकरी
२०१६-१७             ७५,०००
२०१७-१८             २२,०००
.........................................
एकूण                     ९७,०००

थकबाकीदार शेतकºयांनी कर्जासाठी सावकारांकडे जाऊ नये. एक रकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत थकीत कर्जाची परतफेड करून, नवीन पीक कर्ज घेतले पाहिजे.
- आलोक तारेणिया
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.
 

 

Web Title: Farmer not get crop loan, ran to private money lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.