Fake currency case, one arrested in Murtijapur | बनावट नोटा प्रकरण, मूर्तिजापूर येथील एकास अटक
बनावट नोटा प्रकरण, मूर्तिजापूर येथील एकास अटक

मूर्तिजापूर (अकोला) : गुजरात पोलिसांच्या स्पेशल आॅपरेशन ग्रुपने बनावट नोटा प्रकरणी येथील एका आरोपीस अटक केली आहे.
रियाज ग्यासोद्दीन सैयद असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा गुजरात येथील असून, मूर्तिजापूर येथे नातेवाइकाकडे राहत होता. त्याच्याजवळून एक रंगीत प्रिंटर जप्त केले.
याप्रकरणी आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता असून, सदर आरोपी केव्हापासून बनावट नोटा छापत होता व त्या नोटा कुठेकुठे पाठवून चलनात आणल्या
जात होत्या, याबाबतची सविस्तर माहिती पुढील तपासात समोर
येऊ शकते.


Web Title: Fake currency case, one arrested in Murtijapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.