अकोला शहराला अतिक्रमणाचा विळखा; महापौरांचा आदेश विरला हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:48 PM2018-05-17T13:48:12+5:302018-05-17T13:48:12+5:30

अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले.

Encroachment of Akola; Mayor's order in vain | अकोला शहराला अतिक्रमणाचा विळखा; महापौरांचा आदेश विरला हवेत!

अकोला शहराला अतिक्रमणाचा विळखा; महापौरांचा आदेश विरला हवेत!

Next
ठळक मुद्देप्रचंड गर्दीमुळे अकोलेकरांना मुख्य बाजारपेठेतून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मुख्य रस्त्यांवर ठाण मांडणाºया अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे.अतिक्रमणाचा अकोलेकरांना त्रास झाल्यास हेच पदाधिकारी महापालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे विशेष.

अकोला: शहरातील अतिक्रमण आठ दिवसांत न हटविल्यास अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ न देता सेवा बंद करण्याचा इशारा सर्वसाधारण सभेत महापौर विजय अग्रवाल यांनी दिला होता. अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. हा प्रकार लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल त्यांच्या इशाऱ्यानुसार कारवाई करतात की सभागृहात घेतलेला निर्णय मागे फिरवतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधी रोड, टिळक रोड, जुना कापड बाजार आदी भागांकडे पाहिल्या जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते रेडिमेड कपड्यांसह विविध वस्तूंची दुकाने या परिसरात आहेत. प्रचंड गर्दीमुळे अकोलेकरांना मुख्य बाजारपेठेतून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मुख्य रस्त्यांवर ठाण मांडणाºया अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे. मनपाच्या आवारभिंतीलगत ‘पार्किंग’साठी जागा राखीव असताना अतिक्रमण विभागाच्या नाकावर टिच्चून रेडिमेड कापड व्यावसायिक दुकाने थाटतात. सणासुदीच्या दिवसांत अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गळ काही राजकीय पदाधिकाºयांकडून घातली जाते. त्याचवेळी अतिक्रमणाचा अकोलेकरांना त्रास झाल्यास हेच पदाधिकारी महापालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे विशेष.
महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष
मनपाच्या अतिक्रमण विभागाचे रस्त्यावर दुकाने मांडणाºया अतिक्रमकांसोबत आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप खुद्द महापौर विजय अग्रवाल यांनी ९ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत केला होता. या विभागातील मानसेवी कर्मचाºयांनी अतिक्रमण दूर न केल्यास त्यांची सेवा बंद करण्याचा गर्भीत इशारा महापौरांनी दिला होता. महापौरांच्या इशाºयानंतर गेंड्याची कातडी असलेल्या या विभागाने व नियंत्रण अधिकाºयांनी कोणतीही ठोस भूमिका बजावली नसल्यामुळे अतिक्रमणाची समस्या कायमच असल्याचे चित्र आहे. यावर महापौर काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


अतिक्रमण विभागाची मुजोरी कायम

गांधी चौकातील अतिक्रमणाला मनपाचे अभय गांधी चौकातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक उभारून त्याला ग्रिल लावली आहे. पेव्हर ब्लॉक बसवताना मनपाचे सर्व निकष, नियम पायदळी तुडवत गांधी चौकातील थेट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लघु व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पार्किंगच्या जागेवर व्यवसाय कसा?
गांधी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी राखीव आहे. पार्किं गच्या जागेवर काही अतिक्रमकांनी व्यवसाय उभारल्याचे चित्र
नेहमीच दिसून येते. हाच प्रकार पार्किंगसाठी राखीव असणाऱ्या इतरही जागेवर सर्रासपणे दिसून येतो. मनपाच्या अतिक्रमण विभागाचे या
प्रकाराकडे दुर्लक्ष होतेच कसे, असा सवाल उपस्थित होतो.

 

Web Title: Encroachment of Akola; Mayor's order in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.