विदर्भात वर्षभरात २९.५९ कोटीच्या वीजचोऱ्यांचाा भंडाफोड

By atul.jaiswal | Published: April 24, 2018 04:47 PM2018-04-24T16:47:30+5:302018-04-24T16:47:30+5:30

अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या.

electricity thept of 29.59 crore ruppes detected in vidarbha | विदर्भात वर्षभरात २९.५९ कोटीच्या वीजचोऱ्यांचाा भंडाफोड

विदर्भात वर्षभरात २९.५९ कोटीच्या वीजचोऱ्यांचाा भंडाफोड

Next
ठळक मुद्देअकराही जिल्ह्याच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ९३२० वीज जोडण्यांची तपासणी केली. मीटरमध्ये फेरफार अथवा अन्य प्रकारांनी होत असलेल्या १० कोटी ९६ लाख ८० हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरीची २४८२ प्रकरणे उघडकीस. ४८ लाख ३८ हजाराच्या १०७ प्रकरणात वीज वापरातील अनियमितता आढळल्या आहेत.

अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या. त्यापैकी २० कोटी १४ लाख २१ हजार रुपयांची वसुली करण्यात महावितरणला यश मिळाले आहे.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद साळवे आणि नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी उपसंचालक मंगेश वैद्य यांच्या नेतृत्वात विदभार्तील अकराही जिल्ह्याच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ९३२० वीज जोडण्यांची तपासणी केली. या मोहीमेत भरारी पथकांनी वीज वाहिनीवर थेट आकडा टाकून होत असलेल्या वीजचोरीची ३६८९ प्रकरणे उघडकीस आणली. याशिवाय भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ आणि १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार अथवा अन्य प्रकारांनी होत असलेल्या १० कोटी ९६ लाख ८० हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरीची २४८२ प्रकरणे उघडकीस आणली. यात अकोला मंडलातील २४३, अमरावती २२९, बुलढाणा २००, भंडारा २५१, चंद्रपूर २०५, नागपूर शहर १८७ , नागपूर ग्रामिण १८९, वर्धा २००, यवतमाळ २५०, गोंदीया २१७, गडचिरोली १२४ तर वाशिम मंडलातील १८७ वीजचोºयांचा समावेश आहे.
याशिवाय भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ अन्वये ४८ लाख ३८ हजाराच्या १०७ प्रकरणात वीज वापरातील अनियमितता आढळल्या आहेत. यात सर्वाधिक २३ प्रकरणे यवतमाळ मंडलातील तर त्याखालोखाल अमरावती मंडलातील २१ प्रकरणे असून, अकोला ५, बुलढाणा ४, भंडारा १२, चंद्र्रपूर ९, नागपूर शहर ८, नागपूर ग्रामिण, वर्धा आणि गोंदीया मंडलातील प्रत्येकी ७ तर गडचिरोली आणि वाशिम मंडलांतील प्रत्येकी २ प्रकरणांचा समावेश आहे. तर अनियमित वीज वापराची इतर १११५ प्रकरणातून १८ कोटी १३ लाख ६२ हजाराचा अनियमित वीजवापर उघडकीस आणण्यात भरारी पथकाला यश मिळाले आहे. यात अकोला मंडलातील ११५, अमरावती मंडलातील ७१, बुलढाणा ३३, भंडारा ११६, चंद्रपूर १०६, नागपूर शहर १६२, नागपूर ग्रामिण १५०, वर्धा ५८, यवतमाळ ७१, गोंदीया ९७, गडचिरोली ३८ तर वाशिम मंडलातील ९८ प्रकरणांचा समावेश आहे.

 

Web Title: electricity thept of 29.59 crore ruppes detected in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.