‘निवडणूक साक्षरता क्लब ’ विद्यार्थ्यांना पटवून देणार मताची किंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:16 PM2018-06-22T14:16:52+5:302018-06-22T14:16:52+5:30

अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ४२२ शाळा -महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब’ स्थापन करण्यात आले असून, या ‘क्लब’द्वारे विद्यार्थ्यांना मताची किंमत आणि महत्त्व पटवून देण्यासह मतदानासंदर्भात जाणिव -जागृतीचे काम करण्यात येणार आहे.

'Election Literacy Club' will convince students to price! | ‘निवडणूक साक्षरता क्लब ’ विद्यार्थ्यांना पटवून देणार मताची किंमत!

‘निवडणूक साक्षरता क्लब ’ विद्यार्थ्यांना पटवून देणार मताची किंमत!

googlenewsNext
ठळक मुद्देशाळा-महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब ’ स्थापन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. गत २५ जानेवारीपासून अकोला जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याची मोहीम राबविण्यात आली. गत ३१ मे पर्यंत माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील ४२२ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ४२२ शाळा -महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब’ स्थापन करण्यात आले असून, या ‘क्लब’द्वारे विद्यार्थ्यांना मताची किंमत आणि महत्त्व पटवून देण्यासह मतदानासंदर्भात जाणिव -जागृतीचे काम करण्यात येणार आहे.
नवमतदारांमध्ये निवडणूक आणि मतदानासंदर्भात जागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब ’ स्थापन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून गत २५ जानेवारीपासून अकोला जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याची मोहीम राबविण्यात आली. गत ३१ मे पर्यंत माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील ४२२ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या निवडणूक साक्षरता क्लबद्वारे शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदानासंदर्भात जागृती करण्यात येणार असून, मताची किंमत व मताचे महत्त्व पटवून देण्याचे काम करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक, मतदानासंदर्भात जाणिव जागृती निर्माण करण्यासह लोकशाही प्रक्रियेला गती देण्याच्या प्रक्रियेलाही मदत होणार आहे.

निवडणूक साक्षरता क्लबचे असे आहेत उद्देश!
मतदार नोंदणी तसेच नवीन मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे, त्यांच्यात निवडणूक संस्कृती टिकविणे ही निवडणूक साक्षरता क्लबची जबाबदारी आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची मतदार यादीत नोंदणी करणे व निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे, निवडणुकांमध्ये तरुण भावी मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यांना मताची किंमत व महत्त्व समजावण्यासाठी प्रोत्साहन देणे असे निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याचे उद्देश आहेत.

‘क्लब’ची माहिती पाठविली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे !
अकोला जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ४२२ निवडणूक साक्षरता क्लबची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे पाठविण्यात आली आहे.

 

Web Title: 'Election Literacy Club' will convince students to price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.