बाळापूर नगर परिषदेच्या ट्रॅक्टरखाली चालकाचा मृत्यू   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:10 PM2018-05-11T15:10:24+5:302018-05-11T15:11:33+5:30

   बाळापुर: बाळापूर  नगर परिषदेचा कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर  खाली  चालकाचा जागीच मुत्यु  झाल्याची  घटना शहरात  आज सकाळी  ८ वाजता काळबाई वेशी कडे घडली.         

Driver dies under tractor of Balapur Municipal Council | बाळापूर नगर परिषदेच्या ट्रॅक्टरखाली चालकाचा मृत्यू   

बाळापूर नगर परिषदेच्या ट्रॅक्टरखाली चालकाचा मृत्यू   

Next
ठळक मुद्दे अ.अजीज अ.रज्जाक ५८ हे सफाई कामगारांना  घेऊन  कालेखानीपुरा भागातील  कचरा उचलण्या साठी  गेले होते.ट्रॅक्टर उतारावर उभे करुन ट्रॅक्टरचे चाकाला दगड लावत असताना  अचानक  ट्रॅक्टर  उतार असल्याने  पुढे गेले.दगड  लावत असताना खाली  वाकलेल्या अ. अजीज याना कळण्या अगोदरच त्यांचे  डोके  मोठ्या  चाका खाली दबुन त्याच्या  जागीच मुत्यु  झाला. 

   बाळापुर: बाळापूर  नगर परिषदेचा कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर  खाली  चालकाचा जागीच मुत्यु  झाल्याची  घटना शहरात  आज सकाळी  ८ वाजता काळबाई वेशी कडे घडली.             

 प्राप्त  माहीती नुसार  नगर परिषदेच्या  वतीने कंञाटदाराने नगर  परिषदे  च्या ट्रॅक्टर  नं, एम. एच. ३० एच. १०२ वर चालक म्हणून  अ.अजीज अ.रज्जाक ५८ हे सफाई कामगारांना  घेऊन  कालेखानीपुरा भागातील  कचरा उचलण्या साठी  गेले होते. ट्रॅक्टर उतारावर उभे करुन ट्रॅक्टरचे चाकाला दगड लावत असताना  अचानक  ट्रॅक्टर  उतार असल्याने  पुढे गेले.  दगड  लावत असताना खाली  वाकलेल्या अ. अजीज याना कळण्या अगोदरच त्यांचे  डोके  मोठ्या  चाका खाली दबुन त्याच्या  जागीच मुत्यु  झाला.   ही घटना त्यांच्या  राहत्या घरा पासुन केवळ १०० फुटावरच घडली. बाळापूर  पोलीसानी सफाई  कामगार  राकेश चावरीया यांचे  फिर्यादी  वरुन  या घटनेस चालक अ. अजीज हे कारणीभूत  ठरल्याने त्याच्या  विरुध्द भा.द.वि.२७९, ३०४ अ नुसार गुन्हा  दाखल करुन पुढील तपास पोलिस  उपनिरीक्षक  विठ्ठल  वाणी करीत आहे.

वाहनाचे दुरुस्ती कडे दुर्लक्ष

जुनाट १५ वर्षापूर्वी  च्या  ट्रॅक्टर  वारंवार  नादुरुस्त असतो. नगर  परिषदेने कचरा उचलण्या साठी २००२ मध्ये  स्थानिक  विकास  निधीतुन  ट्रॅक्टर व ४०७ हे वाहन घातले होते त्याच्या वर अघापही  चालक नव्हता.  रोजदारीवर चालक ठेऊन  कामाकाज करीत २०११ पासुन  शासनाने  शहरातील  कचरा उचलण्याचा कंञाट देऊन  कचरा उचलत होते . कंञाटदार वाहनाचे दुरुस्ती कडे दुर्लक्ष  करीत असल्याने  आजचा अपघात  झाल्याचे बोलले जाते. 

Web Title: Driver dies under tractor of Balapur Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.