अकोला जिल्ह्यात बोंडअळीची मदत तालुका स्तरावर वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:17 PM2018-07-23T14:17:00+5:302018-07-23T14:20:37+5:30

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी वाटपाच्या दुसºया हप्त्यात ५४ कोटी २० लाख रुपयांचा प्राप्त झालेला मदतनिधी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला.

  Distribution of compensation taluka level in Akola district | अकोला जिल्ह्यात बोंडअळीची मदत तालुका स्तरावर वितरित

अकोला जिल्ह्यात बोंडअळीची मदत तालुका स्तरावर वितरित

Next
ठळक मुद्दे १ लाख ३३ हजार ६६८ कापूस उत्पादक शेतकºयांचे १ लाख ४३ हजार ४८० हेक्टर ८५ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले होते. पीक नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती. मदत वाटपाच्या पहिल्या हप्त्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ३६ कोटी १४ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला होता.


अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी वाटपाच्या दुसºया हप्त्यात ५४ कोटी २० लाख रुपयांचा प्राप्त झालेला मदतनिधी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम संबंधित बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ६६८ कापूस उत्पादक शेतकºयांचे १ लाख ४३ हजार ४८० हेक्टर ८५ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले होते. पीक नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदतीचे वाटप तीन हप्त्यात करण्यात येत आहे. त्यामध्ये मदत वाटपाच्या पहिल्या हप्त्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ३६ कोटी १४ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदत निधी वाटपातून शिल्लक राहिलेला ९ कोटी ३ लाखांचा निधी आणि दुसºया हप्त्यातील ४५ कोटी १७ लाख, असा एकूण ५४ कोटी २० लाख रुपयांचा मदतनिधी १९ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० जुलै रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला असून, तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम बोंडअळीग्रस्त संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय वितरित असा आहे मदतनिधी!
तालुका                               रक्कम
अकोला                               ८४११५५००
बार्शीटाकळी                        ४१२४६०००
अकोट                                १४०८२४०००
तेल्हारा                               ११०३२७८००
बाळापूर                              ८६०११०००
पातूर                                  २४६३७२००
मूर्तिजापूर                           ५४८३८५००
.........................................................
एकूण                                 ५४२००००००

 

Web Title:   Distribution of compensation taluka level in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.