अकोला जिल्हा कारागृहातील ३०० कैद्यांना भोजन संचाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:52 PM2018-04-11T17:52:55+5:302018-04-11T17:52:55+5:30

अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ३०० कैद्यांना आधुनिक भोजन संच भेट देऊन कच्छी मेमन जमातीने बुधवारी आपल्या माणुसकीचा परिचय करून दिला.

dinner set gift to 300 prisoners in Akola district jail | अकोला जिल्हा कारागृहातील ३०० कैद्यांना भोजन संचाची भेट

अकोला जिल्हा कारागृहातील ३०० कैद्यांना भोजन संचाची भेट

Next
ठळक मुद्दे मेमन दिवसाच्या निमित्ताने बुधवारी जिल्हा कारागृहात ३०० कैद्यांना फायबर ताट, वाटी आणि ग्लासचे वाटप तुरुंगात अनेक वर्षांपासून अल्युमिनियमच्या ताटात कैद्यांना भोजन दिले जाते. कैद्यांच्या शरीराची मानवीय दृष्टिकोनातून कच्छी मेमन जमातीने हा निर्णय घेतला.


अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ३०० कैद्यांना आधुनिक भोजन संच भेट देऊन कच्छी मेमन जमातीने बुधवारी आपल्या माणुसकीचा परिचय करून दिला. अकोला कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांच्या कल्पनेतून मेमन दिवसाच्या निमित्ताने बुधवारी जिल्हा कारागृहात ३०० कैद्यांना फायबर ताट, वाटी आणि ग्लासचे वाटप सकाळी १० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी, डॉ. अभय पाटील, डीवायएसपी संजय गोरले, जेल अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सिनियर जेलर सोरटे, अ‍ॅड. महंमद परवेज यांच्या हस्ते भोजन संच वाटप करण्यात आले.
तुरुंगात अनेक वर्षांपासून अल्युमिनियमच्या ताटात कैद्यांना भोजन दिले जाते. त्यातून विविध आजार होण्याची शक्यता अलीकडे व्यक्त करण्यात आल्यामुळे कैद्यांच्या शरीराची मानवीय दृष्टिकोनातून कच्छी मेमन जमातीने हा निर्णय घेतला. याचे सर्व मान्यवरांनी कौतुक करून आभार मानले.
यावेळी तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, विजय हिवाळे, प्रकाश चव्हाण, जितेंद्र भावसार, सुभेदार घनश्याम तिवारी, कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया, उपाध्यक्ष साजीद नाथानी, सचिव सलिम गाझी, सहसचिव वाहीद मुसानी, कोषाध्यक्ष सादीक लष्करिया, व्यवस्थापक एजाज सूर्या, हाजी यासीम बचाव, हाजी हनिफ मलक, हाजी फारूक भुरानी, इंमत्याज गणोदवालाल, इजाज डोकाडिया, अतिक भटारा, अकील घाची, अनिस घाची, फिरोज दर्या, हाजी असलम घाची आदी उपस्थित होते.

 

Web Title: dinner set gift to 300 prisoners in Akola district jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.