मतांच्या आकडेवारीत तफावत; ‘वंचित’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मातांच्या आकडेवारीत १३९ मतांची तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेले मतदान आणि मतमोजणीत मोजलेल्या मातांच्या आकडेवारीत १३९ मतांची तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’द्वारे घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ११ लाख १६ हजार ७६३ मतदान झाले. तसेच पोस्टल मतपत्रिकांद्वारे ३ हजार २८३ मतदान झाले असे एकूण ११ लाख २० हजार ४६ मतदान झाले असताना, मतमोजणीत ११ लाख २० हजार १८५ मतांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे एकूण झालेले मतदान आणि मतमोजणीत मोजलेली मते, यामध्ये १३९ मतांची तफावत असल्याने साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून, पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची मागणीही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे तक्रारीत करण्यात आली. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताने, राजेंद्र पातोडे, सैफुउल्लाह खान, दीपक गवई, सुरेश शिरसाट, पराग गवई, दिनकर खंडारे, विलास गवई, मंगेश गवई, गजानन गवई, प्रभाकर अवचार, दिलीप मोहोड आदी उपस्थित होते.

 

संदर्भ पढ़ें