Dharmajagran Yatra of Sri Ramanavami Samiti will start in Akola and Buldana district | अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून निघणार श्रीरामनवमी समितीची धर्मजागरण यात्रा

ठळक मुद्दे१० मार्च रोजी मोठे राममंदिर येथून सकाळी ७ वाजता ५५० किमीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यावेळी पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यातही यात्रेद्वारे जनजागृती केली जाणार आहे. यंदा २५ मार्च रोजी श्रीरामनवमी असून, त्यानुषंगाने सूर्यनारायणाचे सात अश्वांवर आरूढ प्रतिमेचे १८ मार्च रोजी वितरण केले जाणार आहे.


अकोला : श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यंदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून मातृशक्ती, धर्मजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० मार्च रोजी मोठे राममंदिर येथून सकाळी ७ वाजता ५५० किमीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. शहरातील व परिसरातील असंख्य रामसेवक तसेच महिला अकोला ते सुपो पळशी येथे जाण्यासाठी निघणार आहेत.
श्रीरामनवमीच्या पृष्ठभूमीवर दरवर्षी शोभायात्रा समितीच्यावतीने धर्मजागरण यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा २५ मार्च रोजी श्रीरामनवमी असून, त्यानुषंगाने सूर्यनारायणाचे सात अश्वांवर आरूढ प्रतिमेचे १८ मार्च रोजी वितरण केले जाणार आहे. मूर्तींचे अनुष्ठान करण्यासाठी मातृशक्तींचा सहभाग असणाºया धर्मजागरण यात्रेला १० मार्चपासून सुरुवात केली जाणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यावेळी पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यातही यात्रेद्वारे जनजागृती केली जाणार आहे. त्यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ, अकोला पूर्व, बाळापूर, जळगाव जामोद, मलकापूर व खामगाव मतदारसंघाचा समावेश राहणार आहे. यात्रेच्या दरम्यान ठिकठिकाणी श्रीरामांचे पूजन केले जाणार आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी, तर आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली २२ ठिकाणी, आ. चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनात पाच ठिकाणी तसेच आ. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली सहा ठिकाणी धर्मजागरण यात्रेचे स्वागत केले जाणार आहे.


शोभायात्रा समिती सरसावली!
श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष महादेवराव हुरपडे, आ. गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच अकोला-बुलडाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात धर्मजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी कैलाश अग्रवाल, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ. संजय सोनावणे, डॉ. अभय जैन, रमेश कोठारी, गिरीश जोशी, अनिल मानधने, अनिल थानवी यांच्यासह असंख्य रामसेवक कामाला लागले आहेत.


Web Title: Dharmajagran Yatra of Sri Ramanavami Samiti will start in Akola and Buldana district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.