अकोला जिल्ह्यात वर्षभरात १३५ सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:46 PM2018-08-10T12:46:06+5:302018-08-10T12:49:23+5:30

अकोला : अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात १३५ सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्र्फत फौजदारी कारवाई करण्यात आली.

 Criminal proceedings against 135 lenders in Akola district this year! | अकोला जिल्ह्यात वर्षभरात १३५ सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई!

अकोला जिल्ह्यात वर्षभरात १३५ सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई!

Next
ठळक मुद्देत्यामध्ये २९ अवैध सावकार व १०६ परवानाधारक सावकारांचा समावेश आहे. कर्जाचा व्यवहार करणाऱ्या १०६ परवानाधारक सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

- संतोष येलकर 

अकोला : अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात १३५ सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्र्फत फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये २९ अवैध सावकार व १०६ परवानाधारक सावकारांचा समावेश आहे.
अवैध सावकारीसंदर्भात गत वर्षभरात सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर सहायक निबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालयांकडे अवैध सावकारी प्रकरणांत दाखल झालेल्या तक्रारींवर संबंधित कार्यालयांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमार्फत सुनावणी घेण्यात आल्या. त्यामध्ये अवैध सावकारी सिद्ध झालेल्या प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्यात आली. ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत १३५ सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमार्फत फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील २९ अवैध सावकार आणि कार्यक्षेत्राबाहेर कर्जाचा व्यवहार करणाऱ्या १०६ परवानाधारक सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

सावकारीत बळकालेली १२६ एकर जमीन शेतकºयांना परत!
अवैध सावकारीच्या प्रकरणांत जिल्ह्यात २६ शेतकºयांची सावकारांनी बळकावलेली १३६ एकर २६ गुंठे शेतजमीन संबंधित शेतकºयांना परत करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयामार्फत करण्यात आली. तसेच अवैध सावकारीतून बळकावलेला एक ‘फ्लॅट’देखील परत करण्यात आला. अवैध सावकारीतून बळकावलेल्या जमिनी परत मिळाल्याने संबंधित शेतकºयांना दिलासा मिळाला.

अवैध सावकारीच्या प्रकरणांत दाखल तक्रारींपैकी ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात २९ अवैध सावकार आणि कार्यक्षेत्राबाहेर कर्जाचा व्यवहार करणाºया १०६ परवानाधारक सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
-गोपाळ मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

Web Title:  Criminal proceedings against 135 lenders in Akola district this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.