ई-वे बिलिंगसाठी जीएसटी कार्यालयाकडून राज्यात रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:50 AM2018-01-22T00:50:47+5:302018-01-22T00:51:50+5:30

अकोला : राज्यात १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलिंगची रंगीत तालीम जीएसटी कार्यालयांकडून राज्यभरात सुरू झाली आहे. मालाची आंतरराज्यीय दळण-वळण करीत असलेल्या  विक्रेता, करदात्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून हा प्रयोग केला जात असून, डीलर आणि वाहतूकदारांनी त्यादरम्यान नोंदणी करून यंत्रणा समजून घ्यावी, असे आवाहन मुंबई बॉर्डर चेक पोस्टचे राज्याचे कर सह आयुक्तांनी केले आहे. 

Colored training from the GST office in the state for e-way billing | ई-वे बिलिंगसाठी जीएसटी कार्यालयाकडून राज्यात रंगीत तालीम

ई-वे बिलिंगसाठी जीएसटी कार्यालयाकडून राज्यात रंगीत तालीम

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रेता, करदाते आणि वाहतूकदारांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलिंगची रंगीत तालीम जीएसटी कार्यालयांकडून राज्यभरात सुरू झाली आहे. मालाची आंतरराज्यीय दळण-वळण करीत असलेल्या  विक्रेता, करदात्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून हा प्रयोग केला जात असून, डीलर आणि वाहतूकदारांनी त्यादरम्यान नोंदणी करून यंत्रणा समजून घ्यावी, असे आवाहन मुंबई बॉर्डर चेक पोस्टचे राज्याचे कर सह आयुक्तांनी केले आहे. 
संपूर्ण देशात फेब्रुवारीपासून ई-वे बिलिंग प्रणाली सुरू होत आहे. त्यासाठी राज्याच्या जीएसटी कार्यालयाच्यावतीने आंतर राज्यीय यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. लवकरच राज्यही त्या दिशेने सक्षम होत आहे. १ फेब्रुवारीच्या आत कधीही तशी सूचना राज्याच्या जीएसटी कार्यालयाकडून येऊ शकते. त्यामुळे राज्याच्या जीएसटी कार्यालयाच्यावतीने प्रयोगिक तत्त्वावर १६ ते ३१ जानेवारीदरम्यान राज्यात ई-वे बिलिंगच्या अंमलबजावणीची रंगीत तालीम सुरू केली आहे. त्यासाठी ई-वे बिलिंगचे वितरणही सुरू झाले आहे. मात्र, ते ट्रायल बेसीसवर आहेत. महाराष्ट्र वस्तू आणि सेवेच्या कर प्रणालीच्या नियमावलीत सहा बदल यानिमित्ताने करण्यात आले आहेत. त्याबाबतची संपूर्ण माहिती जीएसटी पोर्टल आणि एनआयसीच्या साईटवर जाहीर केली गेली आहे. दरम्यान, डीलर, करदाते आणि वाहतूकदारांसाठी राज्यात हेल्प डेस्क उघडण्यात आले आहे. सोबतच टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ज्या वाहतूकदारांनी ई-वे बिलिंगची नोंदणी केली नसेल, त्यांनी यादरम्यान संपर्क साधावा, असे आवाहनही जीएसटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Colored training from the GST office in the state for e-way billing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.