मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा; हनुमान मंडळ संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:16 PM2018-12-11T14:16:43+5:302018-12-11T14:18:01+5:30

मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे विजेतेपद हनुमान मंडळ केळीवेळी संघाने पटकाविले.

CM kabaddi competition; Hanuman Mandal won the title | मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा; हनुमान मंडळ संघाला विजेतेपद

मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा; हनुमान मंडळ संघाला विजेतेपद

Next


अकोला: बुद्धी, चातुर्य, संयम, एकाग्रचित्त, व्यायाम या बाबींचा संगम कबड्डी खेळ आहे. मुख्यमंत्री चषक स्पर्धेमध्ये शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग हा स्पर्धेच्या लोकप्रियतेचा भाग असून, या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अकोला पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना समर्पित सन्मानासाठी शेतकरी नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृती या स्पर्धेला प्रेक्षकांचा सहभाग प्रशंसनीय असल्याचे मत खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.
लक्ष्मणदादा जंगम क्रीडांगण उमरी येथे भाऊसाहेब फुंडकर मैदानात आयोजित मुख्यमंत्री चषक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी खासदार धोत्रे बोलत होते. स्पर्धेत ६० पुरुष व ८ महिला संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे विजेतेपद हनुमान मंडळ केळीवेळी संघाने पटकाविले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते, तर मंचावर आयोजक आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, विशाल इंगळे, डॉ. विनोद बोर्डे, डॉ. रणजित सपकाळ, प्रकाश पाटील हागे, डॉ. किशोर मालोकार, संजय जिरापुरे, डॉ. राजकुमार बुले, वासुदेव नेरकर, विवेक भरणे, सिद्धार्थ शर्मा, दिनकर गावंडे, मिलिंद राऊत, संतोष वाकोडे, छावा जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, जयंत मसने, संतोष शेगोकार, गणेश सारसे, अनिल गावंडे, अनिल नावकर, विलास वखरे, रामराव मसने, अनिल गरड, बाळ ताले, रंजना विंचनकर, अजय शर्मा, संदीप गावंडे विराजमान होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले. पुरुष गटामध्ये हनुमान कबड्डी क्रीडा मंडळ अ-गट केळीवेळी या संघाने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक हनुमान कबड्डी क्रीडा मंडळ ब-गट, तर तृतीय क्रमांक गट महाकाली क्रीडा मंडळ उमरी तर चतुर्थ क्रमांक जय जगदंबा क्रीडा मंडळ उमरी महिला गटामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद क्रीडा मंडळ हिंगणा तर द्वितीय क्रमांक जगदंबा क्रीडा मंडळ उमरी, तृतीय क्रमांक जय महाकाली कबड्डी संघ उमरी तर चतुर्थ क्रमांक भवानी कबड्डी संघ दहीगाव गावंडे तर रेडर कुमारी किरण जरांगे, मोनाली वाघवे यांनी काम पहिले. प्रतिज्ञा तेलगोटे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकले.
 

 

Web Title: CM kabaddi competition; Hanuman Mandal won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.