क्षुल्लक कारणावरून हाणामारी; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:36 PM2019-05-25T17:36:24+5:302019-05-25T17:37:10+5:30

मूर्तिजापूर : बायपास येथील लग्न वरातीसाठी घोडा घेऊन जात असताना लहान मुलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चौघांनी काठ्या व लोखंडी पाईपने हल्ला केला.

Clash of rage; Two serious | क्षुल्लक कारणावरून हाणामारी; दोन गंभीर

क्षुल्लक कारणावरून हाणामारी; दोन गंभीर

Next

मूर्तिजापूर : बायपास येथील लग्न वरातीसाठी घोडा घेऊन जात असताना लहान मुलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चौघांनी काठ्या व लोखंडी पाईपने हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता कारंजा बायपासवर घडली. अमर प्रकाश वानखडे व त्याचा मित्र जितेश रमेश होटे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले असून रात्री उशिरा चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मूर्तिजापूर येथील एका लग्न समारंभात वरातीसाठी शुक्रवारी अमर वानखडे व त्याचा मित्र जितेश होटे हे दोघे घोडा घेऊन जात होते. दरम्यान त्यांना लहान मुले भांडण करीत असताना दिसली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी हे दोघेही धाऊन गेले. परंतु दुसऱ्या बाजूने मंगेश इंगळे, प्रणय इंगळे, शैलेश इंगळे व गोलू इंगळे रा. भिम नगर मूर्तिजापूर हे हातात काठ्या व लोखंडी पाइप घेऊन आले आणि अमर आणि जितेश यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात अमर आणि जितेश यांच्या डोक्याला व हातापायांना मार लागुन त्यात ते गंभीर जखमी झाले. अमर प्रकाश वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलीसांनी चारही आरोपींवर भादंवि कलम ३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष धारपवार, पोलीस शिपाई अमोल भांड हे करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Clash of rage; Two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.