ठळक मुद्दे२५ हजारांचा ऐवज लंपास पोलिसांच्या गस्ती पथकावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूर शहरातील विविध सहा ठिकाणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री चोरांनी चोर्‍या करून सुमारे २५ हजारांच्या वस्तू लंपास केल्या आहेत. यामध्ये काही प्रकरणात गुन्हा दाखल केला, तर काही चोरीच्या प्रकरणातील फिर्यादी पातूर पोलिसांनी तपासात ठेवल्या आहेत.
पातुरातील खाटीकपुरा, तपेहनुमान नगर, भीमनगर, बाळापूर वेस परिसर व शनिवारपुर्‍यासह अन्य ठिकाणी चोरट्यांनी ट्रॅक्टरचे सायलेन्सर, तीन सायकली, काळी-पिवळी टॅक्सीची बॅटरी, अँपे ऑटोची बॅटरी व पाण्याच्या टाकीची चोरी करण्यात आली आहे. यामध्ये नीलेश डोंगरे यांची सायकल, विनोद धाडसे यांच्या एमएच ३0 पी ७७३0 क्रमांकाच्या अँपेची इको कंपनीची बॅटरी, डिगांबर गोतरकर यांच्या  एमएच ३0 जे ९0५0 क्रमांकाच्या वाहनाचे सायलेन्सर व एअर क्लीनर, आनंदा शेगोकार यांच्या एमएच ३0 जे ७८५१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे सायलेन्सर, किशोर येरखडे यांच्या काळी-पिवळी टॅक्सीची बॅटरी, रामदास बगाडे यांच्या एमएच १८ झेड ८२३९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरची बॅटरी तसेच पाण्याच्या टाकीसह काही सायकलींची चोरी केली. याप्रकरणी फिर्यादी किशोर येरखडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३७९ कलमान्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.