जात, धर्म, पैसा व दारू हाच निवडणुकीचा आधार - डॉ. विठ्ठल वाघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:16 PM2019-04-12T14:16:39+5:302019-04-12T14:16:59+5:30

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. 

Caste, religion, money and liquor are the basis of elections - Dr. Vitthal Wagh | जात, धर्म, पैसा व दारू हाच निवडणुकीचा आधार - डॉ. विठ्ठल वाघ 

जात, धर्म, पैसा व दारू हाच निवडणुकीचा आधार - डॉ. विठ्ठल वाघ 

googlenewsNext

- नितीन गव्हाळे

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.  निवडणुकीत अनेक मुद्दे, समस्या चर्चिल्या जातात. आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित, नावाजलेले कलावंत, या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात, त्यांना कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवे, याचा प्रातिनिधीक आढावा. 

एक कलावंत म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?
लोकशाही पद्धतीने होत नाही. प्रादेशिक, राष्ट्रीय समस्या, प्रश्न, गरजा समोर ठेऊन निवडणुक लढविली पाहिजे. र्दुदैवाने तसे होताना दिसत नाही. खासदारांना गरजा, प्रश्न कसे सोडवाव्या, हे सांगता येत नाही आणि मतदारही विचारत नाहीत. विकासाचे ध्येय असल्याचे उमेदवार सांगतात. परंतु विकासाचे मार्ग, उपाययोजना कोणते आहेत. हे कोणी सांगत नाही. निवडणुक ही एक फास आहे. असे मी समजतो. योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे असायला हवेत?
शेतकरी आत्महत्या, शेतीला पाणी, शेत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग हे मुद्दे हवेत. परंतु त्याकडे जाणीवपुर्वक र्दुलक्ष केल्या जातात.नेरधामणा, जिगाव प्रकल्प रखडलेले आहेत. शहरात उड्डाणपुलांची गरज आहे. परंतु त्याकडे राजकीय पक्ष, उमेदवार प्राधान्य देत नाही. सुतगिरणी, साखर कारखाने सुरू झाले होते. ते टिकविता आले नाहीत. नेतृत्वाकडे जनतेविषयी आपुलकी, तळमळ, जाणीव नाही. अभ्यास नाही. केवळ विकासाच्या गप्पा केल्या जातात.

तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?
अजिबात महत्व देत नाहीत. ज्यांच्यापासून फायदा होतो. भिती वाटते. अशांना महत्व दिल्या जाते. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा असतात. त्यावर कला, साहित्य क्षेत्रातील कलावंतांना नियुक्त केले जात नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात. राजकीय पक्षांना कला, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या फायद्याच्या लोकांनाच महत्व दिल्या जाते.

नवीन मतदारांना काय आवाहन कराल?
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा. परंतु मतदान कोणाला करावे. हा प्रश्न आहे. लोकशाही अनुवांशिक ठरत आहे. एकही पक्ष त्या अपवाद नाही. बाप-लेक गाजतात..माय-लेक गाजोतात..आमच्याच कातड्याचे..सारे ढोल वाजोतात..अशी कविता म्हणत, त्यांनी विचारांपेक्षा भावनेच्या आहारी जाऊन मतदान करू नये.

Web Title: Caste, religion, money and liquor are the basis of elections - Dr. Vitthal Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.