चोहोट्टा बाजार येथे भरधाव बसने इसमास चिरडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:39 PM2018-07-21T13:39:10+5:302018-07-21T13:41:02+5:30

चोहोट्टा बाजार : अकोल्यावरून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बस च्या खाली येऊन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार येथील मुख्य चौकात आज सकाळी  ९ वाजता च्या सुमारास घडली.

The bus crashed a man at chohatta bazar | चोहोट्टा बाजार येथे भरधाव बसने इसमास चिरडले 

चोहोट्टा बाजार येथे भरधाव बसने इसमास चिरडले 

Next
ठळक मुद्देशेखर बाळकृष्ण तायडे राहणार हनवाडी हे आपली पत्नी सावित्री तायडे व दोन मुलांसोबत चोहोट्टा बाजार येथे आले होते.एम. एच. 40 , 93 28 क्रमांकाच्या एसटी बस च्या खाली आल्याने शेखर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच नागरीकांनी एकच गर्दी केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

चोहोट्टा बाजार : अकोल्यावरून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बस च्या खाली येऊन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार येथील मुख्य चौकात आज सकाळी  ९ वाजता च्या सुमारास घडली. शनिवारी सकाळी 9 वाजता च्या सुमारास शेखर बाळकृष्ण तायडे राहणार हनवाडी हे आपली पत्नी सावित्री तायडे व दोन मुलांसोबत चोहोट्टा बाजार येथे आले होते. त्याचवेळी मुख्य मार्गावरून रस्ता ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात असताना  अकोटकडे जाणाऱ्या एम. एच. 40 , 93 28 क्रमांकाच्या एसटी बस च्या खाली आल्याने शेखर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच नागरीकांनी एकच गर्दी केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच दहीहंडाचे ठाणेदार प्रदिप देशमुख , पीएसआय जोशी , पो हे.को.  विजय सावडेकर ,पातोंड पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. प्रेत उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले.  अपघात ग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे .

Web Title: The bus crashed a man at chohatta bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.