हरविलेला मुलगा २४ तासांत पालकांच्या सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:14am

खरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य हा शेगाव येथे शिक्षण घेत आहे. ८  नोव्हेंबर रोजी तो शेगाव येथे जाण्यास नरखेड-भुसावळ पॅसेंजर  रेल्वेगाडीने निघाला; मात्र तो शाळेत पोहोचला नाही. याविषयी रेल्वे  पोलिसांना माहिती देताच त्यांनी २४ तासांत या मुलाचा शोध घेऊन त्याला  पालकांच्या सुपूर्द केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मूर्तिजापूर : तालुक्यातील खरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य हा शेगाव येथे शिक्षण घेत आहे. ८  नोव्हेंबर रोजी तो शेगाव येथे जाण्यास नरखेड-भुसावळ पॅसेंजर  रेल्वेगाडीने निघाला; मात्र तो शाळेत पोहोचला नाही. याविषयी रेल्वे  पोलिसांना माहिती देताच त्यांनी २४ तासांत या मुलाचा शोध घेऊन त्याला  पालकांच्या सुपूर्द केले.   ८ नोव्हेंबर रोजी आदित्य याला त्याच्या आईने पॅसेंजर गाडीत बसवून  रवाना केले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांशी अकोल्यापर्यंत फोनवर सं पर्कात होता; परंतु पुढे गेल्यावर त्याचा फोन बंद झाला व तो शेगाव येथे  पोहोचलाच नाही. त्याच्या वडिलांनी शाळेत व इतर ठिकाणी शोध घेतला;  मात्र रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. दुसर्‍या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी  पोलीस पाटील सोनटक्के यांच्या मदतीने त्याच्या वडिलांनी रेल्वे पोलीस  चौकी गाठून एएसआय भीमराव गवई यांना हकिकत कथन केली. लगेच  त्याची माहिती सोशल मीडिया व्हॉट्स अँपवरून फोटोसह ग्रुपवर टाकून  शोधकाम सुरू केले. तब्बल २४ तासांनंतर एएसआय गवई, पोकाँ. संदीप  भांदुर्गे, पो. हवालदार शेख कलीम यांच्या प्रयत्नाने तो भुसावळ पोलिसांना  रेल्वे स्टेशनवर सुखरूप सापडला.  रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांनी आदित्य त्याच्या आई-वडिलांच्या संपर्कात  आला. या कामात जीआरपी अकोलाचे ठाणेदार सॅम्युवेल वानखडे यांचे  मोलाचे मार्गदर्शन व मदत मिळाली. आदित्यच्या आई-वडिलांनी रेल्वे  पोलिसांचे आभार मानले. 

संबंधित

घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍यास शिक्षा!
वाळू माफियांनी पळविल्या गाड्या
फूल विक्रे ता खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक
बाळापूर नागरी पतसंस्थेतील घोटाळा सहा कोटींच्या घरात
बुलडाणा : शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई केल्याने घातले कु-हाडीचे घाव!

अकोला कडून आणखी

अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
मूर्तिजापूर : दोन लाचखोर ‘पीएसआय’सह पोलीस कर्मचारी निलंबित
बाळापूर नागरी पतसंस्थेतील घोटाळा सहा कोटींच्या घरात
आलेगावात पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा
अकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा तीन अपघातात एक ठार, चार जखमी

आणखी वाचा