अकोल्यातील ‘सर्वोपचार’ रुग्णालयाच्या रक्तपेढी ने गाठला १० हजार रक्तपिशव्या संकलनाचा टप्पा

By atul.jaiswal | Published: January 1, 2018 06:04 PM2018-01-01T18:04:48+5:302018-01-01T18:09:39+5:30

अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीचा रक्त संकलनाचा आलेख दरवर्षी उंचावत असून, रक्तपेढीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही १० हजारपेक्षा अधिक रक्त पिशव्या संकलित करण्याचा टप्पा गाठला आहे.

blood collection of 10,000 bloodpicks GMC Akola | अकोल्यातील ‘सर्वोपचार’ रुग्णालयाच्या रक्तपेढी ने गाठला १० हजार रक्तपिशव्या संकलनाचा टप्पा

अकोल्यातील ‘सर्वोपचार’ रुग्णालयाच्या रक्तपेढी ने गाठला १० हजार रक्तपिशव्या संकलनाचा टप्पा

Next
ठळक मुद्दे वर्ष २०१७ अखेरपर्यंत रक्तपेढीने तब्बल १००३५ रक्तपिशव्या संकलीत करून नविन विक्रम प्रस्थापित केला आहे.वर्ष २०१६ मध्ये रक्तपेढीने १० हजार रक्त पिशव्या संकलीत करण्याचा उच्चांक गाठला.डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी शनिवार, ३० डिसेंबर २०१७ रोजी रक्तदान करून रक्तपेढीचे दहा हजारावे रक्तदाते होण्याचा मान मिळविला.


अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीचा रक्त संकलनाचा आलेख दरवर्षी उंचावत असून, रक्तपेढीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही १० हजारपेक्षा अधिक रक्त पिशव्या संकलित करण्याचा टप्पा गाठला आहे. वर्ष २०१७ अखेरपर्यंत रक्तपेढीने तब्बल १००३५ रक्तपिशव्या संकलीत करून नविन विक्रम प्रस्थापित केला आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. रक्ताला कोणताही पर्याय नसल्यामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी मानवी रक्ताचीच गरज भासते. यासाठी रक्तपेढ्यांमार्फत रक्त संकलित केले जाते. सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांची संख्या मोठी असून, दररोज अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते. रुग्णांच्या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात शासकीय रक्तपेढीची स्थापणा करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काही काळात रक्तपेढीच्या रक्तसंकलनाचा आकडा ५ हजार रक्त पिशव्यांच्या पलिकडे जात नव्हता. वर्ष २००८ ते २०१३ या कालावधीत हा आकडा वर्षभरात ५ हजार रक्त पिशव्या एवढाच होता. त्यानंतर मात्र रक्त संकलनाचा हा आलेख सातत्याने उंचावत जाऊन वर्ष २०१६ मध्ये रक्तपेढीने १० हजार रक्त पिशव्या संकलीत करण्याचा उच्चांक गाठला. सरत्या वर्षातही रक्तपेढीने वर्ष संपण्याच्या एक दिवस आधीच १० हजाराचा टप्पा गाठला. वर्ष अखेरपर्यंत रक्तपेढीने १००३५ रक्त पिशव्या संकलीत केल्या. यामुळे तब्बल १२ हजारपेक्षाही अधिक रुग्णांचा प्राण वाचविणे शक्य झाले आहे.

अधिष्ठाता कार्यकर्ते ठरले दहा हजारावे रक्तदाते
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी शनिवार, ३० डिसेंबर २०१७ रोजी रक्तदान करून रक्तपेढीचे दहा हजारावे रक्तदाते होण्याचा मान मिळविला. गतवर्षीही त्यांनी दहा हजारावे रक्तदान केले होते. यावर्षी ९, ९९९ वा रक्तदाता होण्याचा मान रुग्णालयाचे उप अधिक्षक डॉ. दिनेश नेताम यांना मिळाला. त्यांच्या पत्नीनेही यावेळी रक्तदान केले. याप्रसंगी रक्तपेढी प्रमुख डॉ. बी. एच. नामधारी यांनीही रक्तदान केले. कार्यक्रमाला उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, विभाग प्रमुख डॉ. दिलीप सराटे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, सहायक प्राध्यापक डॉ. श्रीराम चोपडे, महेश महाकालीवार, डॉ. अनिकेत काकडे, ज्योती गवई, रितेश जावेकर, चंदनशिवे, शिरसाठ, अंकुश हे उपस्थित होते.

Web Title: blood collection of 10,000 bloodpicks GMC Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.