भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - सुधीर ढोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:58 PM2019-04-09T15:58:05+5:302019-04-09T16:01:12+5:30

अकोला : भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र ' असे नाव दिले असून, हा जाहीरनामा 'संकल्प पत्र ' नसून लबाडाचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

BJP's 'Sankalpatar' means the invitation of a liar - Sudhir Dhone | भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - सुधीर ढोणे

भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - सुधीर ढोणे

Next

अकोला : भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र ' असे नाव दिले असून, हा जाहीरनामा 'संकल्प पत्र ' नसून लबाडाचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.  अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाच्या जाहीरनाम्याची पोलखोल करताना त्यांनी हा आरोप केला.   २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पृष्ठभूमीवर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात ७५ संकल्प जाहीर केले आहेत. हे संकल्प म्हणजे खोटेपणाचा कळस असून २०१४  च्या निवडणुकीतील १२५ आश्वासने खोटी ठरली असताना आता ती पूर्ण न करताच नवीन ७५  आश्वासने दिल्याने जनतेला ही आश्वासने म्हणजे लबाडाचे आमंत्रण वाटत असल्याचा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे. 

               भाजपने आपल्या २०१४ च्या जाहीरनाम्यात प्रतिवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ५  वर्षात १० कोटी लोकांना रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी असतांना रोजगार तर मिळाला नाहीच उलट नोटबंदीमुळे ४ कोटी ७० लाख लोकांच्या नोक-या गेल्या. बेरोजगारीचा दर ४५ वर्षातील सर्वाधिक मोदीच्या काळातच राहीला.           काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३५ ए व ३७० कलम रद्द करण्याचे,  राममंदीराची  उभारणी व समान नागरी कायदा अमलात आणण्याचे आश्वासन यापूर्वीही दिले होते. मात्र लोकसभा व राज्यसभेत बहुमत असतानाही भाजप सरकारने त्याची पुर्तता केली नाही व परत २०१९ च्या जाहीरनाम्यातही त्याच बाबींचा समावेश केल्याने भाजपाचा ढोंगीपणा उघड झाला असून,  केवळ जनतेला परत एकदा खोटी आश्वासने देवून मुर्ख बनविण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेस अकोला लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी महापौर व काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड,  अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,  अकोला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, अकोला जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साधनाताई गावंडे, नगरसेवक मो. जमीर, राजू चितलांगे, अफरोज लोधी, काँग्रेसचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भुषण टाले पाटील, शेख जावेद आदी पदाधिकारी उपस्थित  होते.

Web Title: BJP's 'Sankalpatar' means the invitation of a liar - Sudhir Dhone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.