भाजप-सेना युती ही पाडापाडीसाठी - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:29 PM2019-02-19T16:29:40+5:302019-02-19T16:36:07+5:30

अकोला : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दो पक्षात झालेली युती ही एकमेकांची पाडापाडी करण्यासाठीच असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली.

BJP-Sena Alliance - Adv. Prakash Ambedkar | भाजप-सेना युती ही पाडापाडीसाठी - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

भाजप-सेना युती ही पाडापाडीसाठी - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Next

अकोला : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दो पक्षात झालेली युती ही एकमेकांची पाडापाडी करण्यासाठीच असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली.

अकोला शहरातील भारिप-बमसंच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शिवसेना -भाजप युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. शिवसेना-भाजपमध्ये एकमेकाला पाडण्याची युती झाल्याचे सांगत, ‘युती’ने पाडापाडीची सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले. युतीमधील ज्या पक्षाचे जादा आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे आपल्याच पक्षाचे जास्तीत -जास्त उमेदवार निवडून कसे येतील, यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगीतले. यावेळी भारिप बहुजन महासंघाच्या नेत्या प्रा.अंजली आंबेडकर, पक्षाचे शहर अध्यक्ष (पूर्व) सिमांत तायडे, महिला आघाडी शहर अध्यक्ष वंदना वासनिक, डॉ.प्रसन्नजीत गवई यांच्यासह इत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाआघाडीची चर्चा माध्यमातून !
कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन वंचीत आघाडीच्या महाआघाडीची चर्चा माध्यमातूनच होत असल्याचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगीतले. मतदारांची ‘सेक्यूलर-नॉनसेक्यूलर’ अशी ओळख (स्टॅम्पींग) करता येणार नाही, असेही आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

 

Web Title: BJP-Sena Alliance - Adv. Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.