बायोमेट्रिक मशीन; कामचुकार कर्मचाऱ्यांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:34 PM2018-10-19T13:34:06+5:302018-10-19T13:34:49+5:30

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दांडी बहाद्दर व कामचुकार कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी सर्व विभागांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली.

Biometric machine; lazy employees in trouble | बायोमेट्रिक मशीन; कामचुकार कर्मचाऱ्यांची कोंडी

बायोमेट्रिक मशीन; कामचुकार कर्मचाऱ्यांची कोंडी

googlenewsNext

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दांडी बहाद्दर व कामचुकार कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी सर्व विभागांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. या मशीनमुळे कामचुकार कर्मचाºयांची कोंडी होत असून, स्वच्छता व आरोग्य विभागातील अंगठा बहाद्दर सफाई कर्मचाºयांनी यावर तोडगा काढण्याची विनंती महापौर व प्रशासनाक डे केल्याची माहिती आहे.
महापालिकेचे विभाग प्रमुख, झोन कार्यालयांवर नियुक्त केलेले कर्मचारी तसेच सकाळी शहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. अशा दांडी बहाद्दर कर्मचाºयांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपा मुख्यालयासह झोन कार्यालयांमध्ये हजेरीसाठी अत्याधुनिक ८५ ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित केल्या. या मशीनमुळे सर्वाधिक अडचण शाळेवरील शिक्षक-मुख्याध्यापकांसह आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची झाली आहे. आरोग्य निरीक्षक पैसे घेऊन सफाई कर्मचाºयांची हजेरी लावत होते. त्यामुळे सफाई कर्मचाºयांचे फावत होते.

सफाई कर्मचाºयांच्या अडचणीत वाढ
हजेरी पुस्तिकेत हजर दाखवून कामावरून पळ काढणारे अनेक सफाई कर्मचारी आरोग्य निरीक्षकांचे खिसे जड करीत होते. बायोमेट्रिकच्या मुद्यावर आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची नकारघंटा कायम असल्याची माहिती आहे. या मशीनमुळे सकाळी वेळेवर हजर व्हावे लागत असून, पुन्हा दोन वेळा हजेरी लावावी लागत आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे क ाही सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बायोमेट्रिकच्या विरोधात कोल्हेकुई!
आजवर पाचव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेसाठी प्रशासनाच्या विरोधात ओरड करणाºया काही कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेचे डोहाळे लागले आहेत. दुसरीकडे १०५ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न न करता बायोमेट्रिकच्या विरोधात अनेक कर्मचारी कोल्हेकुई करीत असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Biometric machine; lazy employees in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.