निरोगी जीवनासाठी सायकल चालविणे आवश्यक - धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:18 AM2018-01-22T02:18:52+5:302018-01-22T02:19:08+5:30

अकोला : केवळ पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालविणे आवश्यक नसून, प्रत्येकाच्या सुदृढ शरीरासाठी सायकल चालविणे काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने रोज सायकल चालविण्याचे आवाहन खा. संजय धोत्रे यांनी येथे केले. ते सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

Bicycling needs to be healthy - Dhotre | निरोगी जीवनासाठी सायकल चालविणे आवश्यक - धोत्रे

निरोगी जीवनासाठी सायकल चालविणे आवश्यक - धोत्रे

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरण संरक्षणासाठी इंधन कंपन्यांची सायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केवळ पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालविणे आवश्यक नसून, प्रत्येकाच्या सुदृढ शरीरासाठी सायकल चालविणे काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने रोज सायकल चालविण्याचे आवाहन खा. संजय धोत्रे यांनी येथे केले. ते सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आ.गोवर्धन शर्मा, माजी नगरसेवक ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ता पवन पाडिया, इंडियन ऑइलचे वरिष्ठ प्रबंधक प्रमोद दंडारे तसेच एनवायसीएस सदस्य व सृजन प्रतिष्ठानचे सचिव स्वानंद गीताश्री यांची उपस्थिती होती. मोठय़ा संख्येत युवकांनी या रॅलीत सहभाग नोंदवित ही रॅली यशस्वी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा यांचे स्वागत इंडियन ऑइलचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले. यावेळी बोलताना खा.धोत्रे यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकाने त्याला दुचाकीची आवश्यक नसेल, तेव्हा सायकल चालविण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना आ. शर्मा यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनातून देशात समान विकास कामे होत असून, त्याचा फायदा सर्वांना होत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेकांनी गॅसवरील सबसिडी सोडली. त्याचा फायदा हा देशातील गरीब महिलांना झाला. त्यांच्या घरी पहिल्यांदाच धूर विरहित गॅस आला. त्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे ते म्हणाले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर खा. संजय धोत्रे यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. तसेच स्वत: सायकल चालवित त्यांनी देखील या रॅलीत सहभाग नोंदविला. 
पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी सायकल दिवस साजरा करण्यात आला. सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्रेसन चौकातील वझिफदार पेट्रोल पंपापासून ही सायकल रॅली सुरू झाली. मोठय़ा संख्येत युवकांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता. 
यावेळी वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत ही रॅली यशस्वी करण्यासाठी मदत केली. कार्यक्रमाला खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, माजी नगरसेवक पवन पाडिया, एनवायसीएसचे सदस्य व  सृजनचे सचिव स्वानंद गीताश्री, इंडियन ऑइलचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद दंडारे, सहायक व्यवस्थापक अमन कुमार, व्यवस्थापक एम.जी. सदावर्ते, कपिल पोतदार, नरेश अग्रवाल, सुरेश वानखडे, नवीन ठाकूर, नितीन जाधव, पराग लहरिया, हरविंदर सिंह सेठी आदींची उपस्थिती होती. 

Web Title: Bicycling needs to be healthy - Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.