मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन

By Atul.jaiswal | Published: April 20, 2018 05:32 PM2018-04-20T17:32:19+5:302018-04-20T17:32:19+5:30

अकोला  :  मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराचे मागे अनिकट पोलीस लाईन येथे बायो सॅनिटायझर तंत्रज्ञान जैविक जल शुध्दीकरण प्रकल्प  उभारण्यात येत आहे.

Bhumipujan of 'Bio Sanitizer' technology project for purification of Morna river | मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन

मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन

googlenewsNext
ठळक मुद्देजैविक जल शुध्दीकरण व जलसंधारण बंधारा  मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराच्या मागे अनिकट पोलीस लाईन येथे उभारण्यात येत आहे. मोर्णाचे पाणी शुध्दीकरणासाठी इको चिप बायो सॅनिटायझर टेक्नॉलॉजीचा वापर करुन वॉटर प्युरिफीकेशन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मोर्णा नदीतील पाण्याचे शुध्दीकरण होऊन परिसरातील पर्यावरणात सुधारणा हाईल, तसेच सभोतालच्या विहीरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी व गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

अकोला  :  मोर्णा नदी जलकुभी व प्लॉस्टीक कचरा काढल्यामुळे खळखळ वाहत आहे. नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराचे मागे अनिकट पोलीस लाईन येथे बायो सॅनिटायझर तंत्रज्ञान जैविक जल शुध्दीकरण प्रकल्प  उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे तसेच महापौर विजय अग्रवाल यांच्या लोकसहभागातून तयार होणा-या विजय घाटचे भुमीपुजन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेद्र वाघ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक हरिष आलीमचंदानी, मोर्णा प्रकल्प अभियंता व जल शुध्दीकरण तज्ञ गुणवंत पाटील ,  मनपा कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे , मोर्णा प्रकल्पाचे  कौंडण्य , कनिष्ठ अभियेता नरेश बावणे याची प्रमुख उपस्थिती होती.

मोर्णा स्वच्छता मोहिम यशस्वी झाल्यानंतर मोर्णा नदीच्या पाण्याची स्वच्छता करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी  पर्यावरण अभियंता गुणवंत पाटील यांनी मोर्णा जैविक जल शुध्दीकरणातून पुर्नजीवन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार मोर्णाचे पाणी शुध्दीकरणासाठी इको चिप बायो सॅनिटायझर टेक्नॉलॉजीचा वापर करुन वॉटर प्युरिफीकेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी जैविक जल शुध्दीकरण व जलसंधारण बंधारा  मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराच्या मागे अनिकट पोलीस लाईन येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भुमीपुजन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेद्र वाघ यांचे हस्ते करण्यात   आले .

या प्रकल्पामुळे मोर्णा नदीतील पाण्याचे शुध्दीकरण होऊन परिसरातील पर्यावरणात सुधारणा हाईल, तसेच सभोतालच्या विहीरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी व गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. या तंत्रज्ञानात कुठल्याही प्रकारचे मशिनरी, रसायने किंवा मनुष्यबळ लागत नाही. यामुळे आवर्ती खर्चात बचत होते. या प्रकल्पाच्या उपयोगानंतर पाण्यातील जलचरांची संख्या वाढते आणि पाण्यातील विषद्रव्यांचे अन्नघटकांत रुपांतर होऊन ते जलचरांना खादय म्हणून उपयोगात येऊ शकते. यामुळे नदीतील वाळू, शंख, शिंपले व आवश्यक जल वनस्पती वाढ होऊन नदीची स्वयंशुध्दीकरण क्षमता वाढते. हेच मोर्णा नदीचे पाणी पुढे पुर्णा नदीला मिळणार असल्यामुळे पुर्णा नदीच्याही पाण्याचे अंशत: शुध्दीकरण होणार आहे. हा केवळ जलशुध्दीकरण प्रकल्प नसून त्यासोबत जलसंधारणाचे फायदे या प्रकल्पामुळे होणार आहे. हवेतील प्रदुषण कमी झाल्यामुळे स्वाईनफल्यु, डेंगू व हवेतील पसारणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळेल.

Web Title: Bhumipujan of 'Bio Sanitizer' technology project for purification of Morna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.