भवसागर माउली पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:25 PM2019-06-17T15:25:38+5:302019-06-17T15:26:04+5:30

अकोला: श्री भवसागर माउली चॅरिटेबल ट्रस्टद्वारा अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ पालखी सोहळ्याचे रामदासपेठ येथून हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

Bhavsagar Mauli Palkhi heading toward Pandharpur | भवसागर माउली पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

भवसागर माउली पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

googlenewsNext

अकोला: श्री भवसागर माउली चॅरिटेबल ट्रस्टद्वारा अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ पालखी सोहळ्याचे रामदासपेठ येथून हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
एक महिना चालणाऱ्या या पायदळ पालखी सोहळ्याचे हे ३१ वे वर्ष आहे. यंदा पालखी सोहळ्यात शेकडो वारकºयासहित दिंडी चालक हभप मुरली घोंगडे, वीणेकरी मुरली नानोटे दुबळवेल, मृदुंगाचार्य शिवराम वक्ते, कीर्तनकार दत्ता मालोकार, मनोहर डुकरे, राठोड महाराज, रामकृष्ण अंबुसकर, शेषराव इंगळे, दिनकर कराळे, प्रकाश बोंद्रे, जगन्नाथ वानखडे, सहदेव शिंदे, साहेबराव वहिले, ज्ञानदेव खडसे, किशोर फुलकर, दादाराव जायले, राम मानकर आदी सहभागी झाले आहेत.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नाना उजवणे यांनी सपत्नीक माउलीची व गजानन महाराजांच्या रजत मूर्तीचा विधिवत अभिषेक व पूजन केल्यानंतर हरिनामाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. राऊत परिवाराने सर्वप्रथम पालखीचे स्वागत केले. हर्षद ओझरकर, रामदासपेठ युवक मंडळ, मुकुंद मंदिर, बबनराव अंबुलकर, प्रवीण शिंदे, हुसे, कुरळकर, आठल्ये प्लॉट, गोपाळ जाधव मराठा नगर, पाडेकर परिवार, शासकीय निवासस्थान, डॉ. गजानन भगत, यशवंत मोने, रतनलाल प्लॉट, अकोला जिल्हा कलाल समाज मंडळ, साठे, बंडू पाटील, अतुल आखरे, महसूल कॉलनी, डॉ. पटोकार, प्रकाश गवळी, किशोर सोपले, सिव्हिल लाइन्स रोड, नवीन बसस्टॅण्ड, भरतीया भवन, महानगरपालिका, सिटी कोतवाली, बबनराव राठोड, काळा मारोती मंदिर, प्रकाश महागावकर, विठ्ठल मंदिर यांच्याकडून पालखीचे स्वागत झाले. यानंतर श्री गजानन महाराज मंदिर शिवनगर येथे पालखी मुक्कामासाठी पोहचली.
उद्या, सोमवार १७ जून रोजी पालखी सकाळी राजू भाटी शिवाजी नगर, नारायण गमे पोळा चौक, मनोहर खंडेलवाल हरिहरपेठ यांच्याकडे विश्रांती घेऊन पातूर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी, दैठणा, परळी वैजनाथ, अंबेजोगाई, ऐरमाळा, जामगाव, उपळाई, माढा, रोपळे मार्ग ८ जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे.
 

 

Web Title: Bhavsagar Mauli Palkhi heading toward Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.