शेतकर्‍यांच्या हितार्थ भारिप-बमसंचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:26 AM2017-11-07T01:26:59+5:302017-11-07T01:27:22+5:30

अकोट :  शेतकर्‍यांच्या हितार्थ असलेल्या विविध मागण्या घेऊन  भारिप-बहुजन महासंघाचा शेतकरी आक्रोश मोर्चा ६ नोव्हेंबर  रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर  धडकला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. 

Bharip-Bamcha's Aarkha Morcha, for the benefit of farmers | शेतकर्‍यांच्या हितार्थ भारिप-बमसंचा आक्रोश मोर्चा

शेतकर्‍यांच्या हितार्थ भारिप-बमसंचा आक्रोश मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकार्‍यांना दिले  निवेदन 

अकोट :  शेतकर्‍यांच्या हितार्थ असलेल्या विविध मागण्या घेऊन  भारिप-बहुजन महासंघाचा शेतकरी आक्रोश मोर्चा ६ नोव्हेंबर  रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर  धडकला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. 
यावेळी दिलेल्या निवेदनात कर्जमाफी फसवणूक थांबविण्यात  यावी, कृषि पंपांना विनाखंडित वीज पुरवठा देण्यात यावा, कापूस,  सोयाबीन, तूर पिकांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव,  अकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, कृषि पंपांचे वीज बिल  माफ करा, शेतमालाची ऑनलाइन विक्री बंद करा,  क्रिमिलेअरमधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची केलेली  शिफारस रद्द करा, तालुक्यातील खड्डेमय राज्य महामार्ग व रस् त्यांची दुरुस्ती करा, कपाशीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्या,  बोगस बी.टी. कपाशी कंपन्यांवर कारवाई करा, पीक विमा मंजूर  करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी भारिप-बमसंचे  जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जि.प.अध्यक्ष संध्या  वाघोडे, प्रभाकर मानकर, प्रतिभा अवचार, जि.प. उपाध्यक्ष जमीर  पठाण, महिला बालकल्याण सभापती देवका पातोंड, शोभा  शेळके आदींसह भारिप-बमसं कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर,  महिला, युवक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Bharip-Bamcha's Aarkha Morcha, for the benefit of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.