आॅटोरिक्षा उलटली; १४ शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:18 PM2018-09-12T12:18:29+5:302018-09-12T12:23:50+5:30

मूर्तिजापूर: धानोरा बु. येथून शेतमजुरांना घेऊन येणारी आॅटोरिक्षा उलटून १४ जण जखमी झाल्याची घटना जामठी फाट्याजवळ बुधवारी सकाळी घडली.

 Autorickshaw accident; 14 laborers injured | आॅटोरिक्षा उलटली; १४ शेतमजूर जखमी

आॅटोरिक्षा उलटली; १४ शेतमजूर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देधानोरा येथील मजूर मूर्तिजापूरकडे विनाक्रमांकाच्या आॅटोरिक्षा मध्ये बसून येत होते. हातगाव-जामठी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

मूर्तिजापूर (जि. अकोला): धानोरा बु. येथून शेतमजुरांना घेऊन मुर्तिजापूरकडे येणारी आॅटोरिक्षा उलटून १४ जण जखमी झाल्याची घटना जामठी फाट्याजवळ बुधवारी सकाळी घडली.
धानोरा येथील मजूर मूर्तिजापूरकडे विनाक्रमांकाच्या आॅटोरिक्षा मध्ये बसून येत होते. या आॅटोरिक्षाने हातगाव-जामठी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यामध्ये तुकाराम राठोड, ज्योतीराम शिंझुर्डे, गीताबाई ज्योतीराम शिंझुर्डे, वनिता विलास आडे, पुनम भगवान ढोरे, शुभम गजानन ढोरे, ज्ञानदेव सुखदेव राठोड, कमलाबाई ज्ञानदेव राठोड, शशिकला अजय चव्हाण,अरुण चव्हाण, सुवर्णा गणेश राठोड, शोभाताई गणेश राठोड, महादेव भगवान करडे सर्व राहणार धानोरा बु. व शे. कलीम शे. जमतील राहणार सोनोरी हे १४ मजूर जखमी झाले. जखमींना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच आॅटो चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर आॅटो गौरखेडी येथील असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी )

Web Title:  Autorickshaw accident; 14 laborers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.