एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:40 AM2018-03-12T01:40:32+5:302018-03-12T01:40:32+5:30

अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

The attempt to break the ATM failed; CC cam-introduced paper! | एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

Next
ठळक मुद्देखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुरक्षा रक्षक सुमित अशोक वाघमारे हे ओरिएन्ट सर्व्हिसमध्ये दोन महिन्यांपासून बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीनवर रात्री साडेदहा ते सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ड्युटीवर असतात. ४ मार्च रोजी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले होते. मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने ते घरी गेले. 
दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता ते परत आले असता, त्यांना बँक आॅफ इंडियाच्या एटीएम बाहेरील कॅमेराला सिल्व्हर कागद लावलेला दिसला व मशीनचे समोरील गेटचे लॉक तुटलेले दिसले. एटीएमचे आतील तीन कॅमेरापैकी दोन कॅमेºयाची तोडफोड केलेली दिसली. तसेच चोरट्यांनी मशीनचा किबोर्ड तोडून मशीनच्या वायरी तोडल्याचे दिसून आले. या प्रकरणी बँकेचे डिंगाबर नामदेव सिरसाट यांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
Web Title: The attempt to break the ATM failed; CC cam-introduced paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.