दीड दशकाची फलक लेखन परंपरा जोपासणारा 'अरूण'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 09:16 AM2017-09-21T09:16:44+5:302017-09-21T09:17:01+5:30

अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद जोपासत आहे.

Arun, who carries a decade of writing writing tradition | दीड दशकाची फलक लेखन परंपरा जोपासणारा 'अरूण'

दीड दशकाची फलक लेखन परंपरा जोपासणारा 'अरूण'

Next

कारंजा (वाशिम), दि. 21 - वाटसरूंचे लक्षवेधून ते थबकतात व सबंध फलक लेखन वाचून काढतात व पुढे वाटचाल करतात. अनभिज्ञ अशा घटना उपयुक्त अशी माहिती ताज्या घडामोडी शहरातील वेंचक घटना यांची संवेदनशिल मनाने दखल घेउन आपल्या दुकानाजवळ लोकसेवेस्तव असलेल्या फलकावर वाचनीय, लोकोपयोगी मजकूर लिहितात. तसेच परिसरातील उल्लेखनिय प्रसंग, वार्ता लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम कारंजा येथील अरूण घोडसाड दिड दशकापासून अविरत करीत आहेत.

अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद जोपासत आहे. घोडसाड हे महाराष्ट्र नाभिक संघाचे वाशिम जिल्हा सचिव आहेत. त्यांचा व्यवसाय केस कर्तनालयाचा आहे. फावल्या वेळात माहिती जमा करून स्वत: लेखन करतात. शहरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन आज कुठे काय ? या शिर्षकातून ते फलकावर उमटवितात. त्यांना स्वत:ला वाचन व्यासंग असल्यामुळे संकलीत केलेल्या माहितीवर ते योग्य संस्कार करतात. बेरोजगारासाठी असलेल्या नोकरीच्या संधी, रेल्वेचे वेळापत्रक, सैन्य भरती, पोलीस भरती, व राजकीय महत्त्वाच्या बातम्या ते फलकावर लिहितात.

ते स्वत: माहिती जमवतात. लोकांकडून मिळवतात. त्या आधारे फलक लेखन करतात. त्यांच्या ग्राहकांना व सराफ लाईन मधून ये जा करणा-या वाटसरूना ही माहिती सहज वाचता येते. त्याच्या माहीती लेखनात स्पष्टता, निशंदिग्धता , अचुक्ता , सुगमता असल्यामुळे लोकांना सहज माहीतीचे आकलन होते. या फलक लेखनाचा एक भाग म्हणजे ते वाचकासाठी एक रोज नवीन सुविचार देतात. कोणत्याही जाती, पंथ, पक्ष ,भाषा याबद्दल आकस न ठेवता फलक लेखन करतात. हे त्यांच्या फलक लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
 
त्यांच्या या फलक लेखनाच्या कार्याबद्ल आमदार राजेंद्र पाटणी यांना आश्चर्य वाटले त्यांनी फलक लेखनाचे महत्त्व लक्षात घेउन लेखकाचे कौतुक केले. असे सजग नागरिक माज्या मतदार संघात आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आपल्या फलक लेखनामुळे लोकांना महत्त्वाच्या घडामोडी कळतात. वाचकांच्या चेह-यावर उमटणारे आश्चर्य व समाधान आनंद देउन जाते.
- अरुण घोडसाड

Web Title: Arun, who carries a decade of writing writing tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.