विषय शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया २१ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:08 PM2019-01-12T13:08:43+5:302019-01-12T13:08:53+5:30

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही.

The appointment process for the subject teachers will start on January 21 | विषय शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया २१ जानेवारीपासून

विषय शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया २१ जानेवारीपासून

Next

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. दरम्यान, विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले; मात्र १९ जानेवारीपर्यंत होणाºया शालेय क्रीडा स्पर्धांमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आता पदस्थापनेची प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त असल्याने विषय शिक्षकांची नियुक्ती करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने ही पदे भरावीत, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अकोला जि.प.मध्ये विषय शिक्षकांच्या पदभरतीअभावी सहायक शिक्षक अतिरिक्त झाल्याने, त्यांना रॅन्डम राउंडमध्ये तालुका बदलून नियुक्ती दिली होती. तीन महिने उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान, गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. त्यावेळी सोमवारपासून विषय शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता होती; मात्र पंचायत समिती स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. त्यामध्ये बदली होणाºया शिक्षकांचाही सहभाग आहे. पदस्थापना प्रक्रिया राबवल्यास त्यांची बदली होईल. त्यांची शाळा बदल होईल. या काळात शालेय स्पर्धांमध्ये अडचण येण्याची शक्यता असल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

 

Web Title: The appointment process for the subject teachers will start on January 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.