...अन् अवघी शाळा झाली गांधीमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:59 PM2018-10-28T12:59:34+5:302018-10-28T13:03:31+5:30

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० जंयती वषार्चे औचित्य साधून ‘गांधी-१५०’ हा अभिनव उपक्रम प्रभात किड्स स्कूल येथे पालक-शिक्षक सभेच्या निमित्ताने शनिवार,२७ आॅक्टोबर रोजी पार पडला.

 ... and the school was just Gandhiji! | ...अन् अवघी शाळा झाली गांधीमय!

...अन् अवघी शाळा झाली गांधीमय!

googlenewsNext
ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या विचारांची रुजवणूक व्हावी, या हेतूने प्रभातचा संपूर्ण परिसरच गांधीमय झाला होता. प्रभात प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी दांडी यांत्रा काढून वातावरणात मांगल्य निर्माण केले.‘प्रभात’मध्येदेखील या उपक्रमातर्गत असलेल्या राष्ट्रपिता सुतकताई केंद्रास पालकांनी भेट दिली

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० जंयती वषार्चे औचित्य साधून ‘गांधी-१५०’ हा अभिनव उपक्रम प्रभात किड्स स्कूल येथे पालक-शिक्षक सभेच्या निमित्ताने शनिवार,२७ आॅक्टोबर रोजी पार पडला.या उपक्रमात प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन गांधीजींना मानवंदना दिली. गांधीजींच्या जीवनावरील विविध कार्यक्रमांमुळे अवघी शाळा गांधीमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा जीवनास नैतिक अधिष्ठान होते. त्यामुळे महात्मा गांधी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. महात्मा गांधी यांच्या विचारांची रुजवणूक व्हावी, या हेतूने प्रभातचा संपूर्ण परिसरच गांधीमय झाला होता. प्रभात प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी दांडी यांत्रा काढून वातावरणात मांगल्य निर्माण केले. गांधीजींनी चरखा स्वातंत्र्य लढ्याशी जोडून श्रमास प्रतिष्ठा दिली होती. ‘प्रभात’मध्येदेखील या उपक्रमातर्गत असलेल्या राष्ट्रपिता सुतकताई केंद्रास पालकांनी भेट दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सुतकताई करुन महात्मा गांधी यांना मानवंदना दिली.
प्रभातमध्ये भजन कट्टा करण्यात आला होता. त्यावर संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी भजन सादर केली. तर सामाजिक विज्ञान शाखा व नाट्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी गांधी यांच्या जीवनावर नाटुकले व मुकनाट्य सादर केले.


यावेळी प्रभातच्या विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधून गांधीजींच्या जीवनकार्यावर प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. या मध्ये अनेक पालकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. यावेळी पालकांनी गांधी कलादालनास भेट देऊन महात्मा गांधींचे चित्र रेखाटले. तसेच नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गांधी गीतांवर नृत्य सादर केले तर गांधींच्या कार्याची ओळख भाषण कट्यावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे करुन दिली. तसेच वाचन कट्ट्यावर गांधी वाड़मय वाचनासाठी उपलब्ध करण्यात आले होते.
जवळपास पाच हजाराच्या वर आई-वडील, पालकांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या गांधी-१५० या अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभातच्या सर्व विभागप्रमुख तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

 

Web Title:  ... and the school was just Gandhiji!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.