जिल्हा परिषद कारभाराचा आंबेडकरांनी घेतला लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:20 PM2019-01-22T12:20:09+5:302019-01-22T12:20:30+5:30

अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला.

Ambedkar took revieve the affairs of Akola Zilla Parishad! | जिल्हा परिषद कारभाराचा आंबेडकरांनी घेतला लेखाजोखा!

जिल्हा परिषद कारभाराचा आंबेडकरांनी घेतला लेखाजोखा!

Next

अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्यांचे निवारण करून योजना मार्गी लावण्याचा सल्ला अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना दिला.
अकोल्यातील निवासस्थानी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेतली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आणि अडचणींसंदर्भात त्यांनी पदाधिकारी व सदस्यांकडून आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा टंचाई निवारणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे निवारण करून दलित वस्ती सुधार योजनेसह इतर योजना मार्गी लावून, लोकांची कामे करण्याचा सल्ला अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना दिला. यावेळी भारिप-बमसं नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह भारिप-बमसंचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

निवडणुकीच्या कामाला लागा; भारिप पदाधिकाऱ्यांना सूचना!
भारिप-बमसंच्या जिल्हा पदाधिकाºयांसह जिल्ह्यातील तालुका पदाधिकारी व अकोला शहर पदाधिकाºयांच्या बैठका घेत, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. पक्षाचे संघटन आणि बुथ कमिट्यांसंदर्भात त्यांनी पक्षाच्या संंबंधित पदाधिकाºयांकडून माहिती घेतली. पक्षाचे संघटन बळकट करण्याच्या कामाला गती देऊन, आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा सल्लाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या पदाधिकाºयांना दिला. निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या तयारीचा आढावादेखील त्यांनी घेतला.

 

Web Title: Ambedkar took revieve the affairs of Akola Zilla Parishad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.