अकोट : गुरू माउलींच्या जन्मोत्सवाला अलोट गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:35 AM2018-02-19T02:35:53+5:302018-02-19T02:36:38+5:30

अकोट : महावैष्णव श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १0१ वा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्रद्धेचा हा अथांग जनसागर उपस्थित भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडून गेला. श्रद्धा, भक्ती व ज्ञानाच्या त्रिवेणी संगमात भक्तगण न्हाऊन गेलेत. 

Akot: Great crowd of Guru Mauli! | अकोट : गुरू माउलींच्या जन्मोत्सवाला अलोट गर्दी!

अकोट : गुरू माउलींच्या जन्मोत्सवाला अलोट गर्दी!

Next
ठळक मुद्देवासुदेव नमो नम: जयघोषाने दुमदुमली संतनगरी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : महावैष्णव श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १0१ वा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्रद्धेचा हा अथांग जनसागर उपस्थित भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडून गेला. श्रद्धा, भक्ती व ज्ञानाच्या त्रिवेणी संगमात भक्तगण न्हाऊन गेलेत. 
श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे या भक्ती सोहळ्याचा प्रारंभ पहाटे गुरू माउली श्रींच्या महाभिषेकाने झाला. संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले व गुरू माउलीचे वंशज मोहनराव जायले पाटील खामगाव यांच्या हस्ते सपेि४‘ी२ँ२ँं१ें4ूस्र’४२क पूजा पार पडली. पूजेचे पौरोहित्य सोपान महाराज वाघ यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, सचिव रवींद्र वानखडे विश्‍वस्त दादाराव पुंडेकर, प्राचार्य गजानन चोपडे, अवि गावंडे, अँड. शिरीष ढवळे, सुनंदा आमले, कमल गावंडे, महादेवराव ठाकरे, अशोकराव पाचडे आदी उपस्थित होते.
गुरू माउली पालखी सोहळ्यात गावोगावच्या शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. गुरू माउलीच्या निवासस्थानी माधवराव मोहोकार व पुरुषोत्तम मोहोकार यांनी श्रींची आरती व वीणा पूजनानंतर पालखी सोहळा शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत श्रद्धासागरला पोहोचला. 
टाळ मृदंगाच्या स्वरात अभंग गायन, पुंडलिका वरदे.., ओम वासुदेव नमो नम: च्या गजराने सारा आसमंत दुमदुमून गेला. रस्त्याच्या दुतर्फा शहरवासीयांनी सद्गुरूंचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले, तर विविध मंडळांनी चौकाचौकांत स्वागत केले. दिंडीत सहभागी वारकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, चहा, फराळाची उत्तम व्यवस्था केली. शहरात अवघी दुमदुमली पंढरी, असे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नंदीपेठ येथे दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्रद्धासागर येथे गुरू माउलींचा जन्मोत्सव पार पडला. 
यावेळी महाराज मंडळी व हजारो भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संचालन संस्थेचे विश्‍वस्त नंदकिशोर हिंगणकर व राममूर्ती वालसिंगे, तर आभार विश्‍वस्त जयदीप सोनखासकर यांनी केले. संस्थेचे व्यवस्थापक अमोल मानकर यांनी कामकाज पाहिले.

उत्कृष्ट दिंडी पुरस्कार प्रदान
गुरू माउली पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या उत्कृष्ट भजनी मंडळाला संत वासुदेव महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार रोख देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये गुरू माउली महिला भजनी मंडळ घुसर, गुरू मारूली भजनी मंडळ दिवठाणा, व श्री कृष्णाजी महिला भजनी मंडळ नंदीपेठ अकोट यांना या मंडळांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला भजनी मंडळ दहीगाव रेचा, जय गजानन वारकरी मंडळ सोनबर्डी यांना प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला. उत्कृष्ट महिला मृदंगाचार्य यांनाही सन्मानित करण्यात आले. 

पुरस्कार वितरण 
गुरू माउली संत वासुदेव महाराज विरचित संत गाडगेबाबांचे ओवीबद्ध चरित्राचे इंग्रजी व मराठी भाषेत अनुवाद केल्याबद्दल डॉ. नरेंद्र माने व प्राची मेंढे दर्यापूर यांचा संत वासुदेव महाराज साहित्य कला पुरस्कार प्रदान करून संतपीठावर यथोचित गौरव करण्यात आला. या दोन्ही ग्रंथाचे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी संपादन केले आहे. यावेळी संजय धोटे, प्रा. गजानन भारसाकडे उपस्थित होते.

Web Title: Akot: Great crowd of Guru Mauli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :akotअकोट