अकोलेकरांची दिवाळीची उलाढाल तब्बल १३० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:04 PM2018-11-09T14:04:37+5:302018-11-09T14:06:47+5:30

अकोेला : गत अनेक दिवसांपासून बाजारपेठेत आलेली मंदी दिवाळीच्या निमित्ताने दूर झाली असून, धनत्रयोदशीपासून बाजारात तेजी आली आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळीत अकोलेकरांनी १३० कोटींची खरेदी केली.

Akolekar's turnover of Diwali is around 130 crore | अकोलेकरांची दिवाळीची उलाढाल तब्बल १३० कोटींवर

अकोलेकरांची दिवाळीची उलाढाल तब्बल १३० कोटींवर

Next

- संजय खांडेकर
अकोेला : गत अनेक दिवसांपासून बाजारपेठेत आलेली मंदी दिवाळीच्या निमित्ताने दूर झाली असून, धनत्रयोदशीपासून बाजारात तेजी आली आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळीत अकोलेकरांनी १३० कोटींची खरेदी केली. सराफा, टू-व्हीलर, फोर-व्हीलर, इलेक्ट्रॉनिक्स, घर, वस्तू, कापड आणि फटाके आदी वस्तू खरेदीवर लोकांनी कोट्यवधी खर्च केल्यामुळे बाजारपेठेत मागील आठवड्यापासून उलाढाल वाढली आहे.
विजयादशमीपासून बाजारातील उलाढाल वाढायला सुरुवात झाली. सराफा बाजारात काही प्रमाणात गर्दी झाली होती; मात्र सोन्याचे भाव सारखे वधारत असल्याने, दिवाळीचा बाजार चांगला राहील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. १ नोव्हेंबरपासून बाजारपेठेतील उलाढाल वाढत गेली अन् हा आकडा १३० कोटींच्या घरात पोहोचला. सोन्याचे भाव ३२ हजारांवर असतानादेखील दागिने खरेदी करण्यासाठी अकोलेकरांनी धनत्रयोदशीच्या दिवशी एकच गर्दी केली. धनत्रयोदशीच्या तुलनेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदीदार कमी होते.

मुहूर्ताच्या खरेदीवर भर
विजयादशमी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त साधून अकोलेकरांनी खरेदी केली. वाहन आणि सोन्याच्या खरेदीसाठी विशेषकरून मुहूर्त पाहिले गेले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी आणि वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात धनत्रयोदशीच्या दिवशीच जास्त झाल्याच्या नोंदी आहेत.

१२०० गाड्यांची विक्री
अकोला शहरात मोठी किराणा दुकाने कमी असले, तरी लहान-सहान दुकानदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंदाज बांधता येत नाही; मात्र ठोक किराणा बाजारातून ही उलाढाल अधोरेखित होते. रेडीमेड कापड व्यावसायिक होणारी उलाढाल दिवसेंदिवस कमी होत आहे. अकोल्यात ५० मोठे शोरूम्स असून, ५० लहान दुकानदार आहेत. सोबतच तीनशेच्यावर गाडीवर रेडीमड कपडे विक्री करतात. दिवाळीनिमित्त टू-व्हीलर गाड्या घेणाºयांची गर्दी जास्त दिसली. जवळपास १२०० गाड्यांची विक्री दिवाळीच्या निमित्ताने झाली, तर शंभर फोर-व्हीलर गाड्या विकल्या गेल्या. 

  १५ कोटींची आतषबाजी शहरात
न्यायालयीन आदेश झुगारून अकोल्यात दिवाळीत अवेळी आतषबाजी केली गेली. जवळपास १७ ठोक फटाका विक्रेत्यांनी सरासरी एक कोटीच्या घरात फटाक्यांची विक्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका दिवसात अकोलेकरांनी १५ कोटी हवेत उडविले आहेत.


- आॅक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये येणारी दिवाळी ही नेहमीच चांगली असते. किराणा बाजारात महिन्याला २५० ट्रक माल येतो; मात्र दिवाळीच्या आठवड्यात तेवढा माल ठोक किराणा बाजारात आला आहे. साखर, बेसन आणि तेल याला जास्त मागणी राहिली.
-सलीम अली, ठोक किराणा बाजार अकोला.

-गृहबांधणीचा अकोल्यातील व्यवसाय धोक्यात आल्यासारखा वाटत होता; मात्र धनत्रयोदशीपासून बाजारात चांगलीच तेजी आली असून, आता पुढचे वर्ष चांगले असेल, असे चित्र आहे. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फ्लॅट आता आरक्षित केले जात आहेत.
-दिलीप चौधरी, क्रेडाई अध्यक्ष, अकोला.

-काही दिवसांआधी बाजार बिलकुल सामसूम होते. आता मात्र खरेदीदार इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंकडे वळला आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारातील उलाढाल चांगली आहे. बाजारपेठेत स्थिरता येईल, असे वाटते.
-श्रीराम मित्तल, इलेक्ट्रॉनिक्स वितरक, अकोला.

-रेडीमेड कापड व्यवसायावर आॅनलाइनच्या विक्रीचा मोठा परिणाम झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेत जवळपास ५० टक्के व्यवसाय आॅनलाइन दुकानदारांनी ओढला आहे. दुष्काळाचा परिणामही बाजारपेठेवर आहे.
-देवानंद ताले, रेडीमेड कापड दुकानदार, अकोला.

 

Web Title: Akolekar's turnover of Diwali is around 130 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.