Akola: Two wheelers killed in a tanker near the railway station, Maldalka | अकोला : रेल्वेस्थानक मालधक्कय़ाजवळ टॅँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ठळक मुद्देभरधाव टँकरने दिली दुचाकीला जबर धडक टॅँकर चालक रामदास पेठ पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्कानजीक टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. रामदास पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन टॅँकर चालकाला ताब्यात घेतले.
अकोट फैलातील रहिवासी मो. अफजल मो. सत्तार (२0) हा युवक एमएच - ३0 - एडी - ७१७९ क्रमांकाच्या दुचाकीने अकोट फैलातून रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांना भरधाव असलेल्या टँकरने जबर धडक दिली. या अपघातामध्ये मो. अफजल मो. सत्तार याचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर या ठिकाणी मोठा जमाव जमला मात्र रामदास पेठ पोलिसांना माहिती मिळताच रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. त्यानंतर टँकर चालकाला ताब्यात घेतले. या अपघातामुळे वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने ही वाहतूक सुरळीत केली. मालधक्का परिसरात नेहमीच वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयही असल्याने वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात होते. याच वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण या परिसरात वाढले आहे.