आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोला संघाचा ५१ धावांनी विजय! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 08:22 PM2017-12-10T20:22:11+5:302017-12-10T20:29:40+5:30

अकोला: व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सहावा सामना  जिमखाना अकोला क्रीडांगण येथे अकोला व गडचिरोली संघात रविवारी झाला.  अकोला संघाने ५१ धावांची आघाडी घेत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला.

Akola team won by 51 runs in inter-city cricket tournament! | आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोला संघाचा ५१ धावांनी विजय! 

आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोला संघाचा ५१ धावांनी विजय! 

Next
ठळक मुद्देजिमखाना अकोला क्रीडांगण येथे पार पडली १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धाअकोला-गडचिरोली संघात रविवारी झाला सामना

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला: व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सहावा सामना  जिमखाना अकोला क्रीडांगण येथे अकोला व गडचिरोली संघात रविवारी झाला.  अकोला संघाने ५१ धावांची आघाडी घेत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला.
अकोला संघाने प्रथम फलंदाजी करीत ३८.४ षटकात सर्वबाद १२१ धावा  काढल्या. जुबेरू द्दीन याने सर्वाधिक २४ धावांचे योगदान दिले. गडचिरोली  संघाकडून कुंदन सुयान, अचल उईके यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. सुनील बारा पात्रे, सूरज पुसाली, ओम गाथे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. १२२ धावांचे लक्ष्य  घेऊन मैदानावर उतरलेल्या गडचिरोली संघाने प्रत्युत्तरात २३.३ षटकात सर्वबाद  ७0 धावा काढून गारद झाला. साहिल देवाडे (१५ धावा) आणि सूरज पुसाली  (१५ धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. अन्य खेळाडू अकोल्याच्या भेदक  गोलंदाजी समोर फारवेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. अर्जुन इंगळे आणि शिवरू  प पाटील यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. विवेक जोशी आणि सिद्धांत मुळे यांना प्र त्येकी १ गडी बाद करण्यात यश मिळाले. सामन्यात पंच म्हणून पवन हलवणे,  आशीष शुक्ला यांनी काम पाहिले. गुणलेखन नीलेश लखाडे यांनी केले. सामन्याचे  आयोजन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर तथा जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला  यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Akola team won by 51 runs in inter-city cricket tournament!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.