Akola team reached semi-finals in state-level hockey tournament; Akola team prevented Bhusawal Railways 3-0! | राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला संघाने गाठली उपान्त्य फेरी; अकोला संघाने भुसावळ रेल्वेला ३-0 ने रोखले!

ठळक मुद्देहिंगोली येथे सुरू  आहे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हिंगोली येथे सुरू  असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने शनिवारी भुसावळ रेल्वे संघाचा ३-0 ने पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली.
भुसावळ रेल्वे संघासोबत खेळताना अकोला संघाचा स्टार प्लेअर चंदन ठाकूरने सामन्याच्या सुरुवातीलाच एक गोल करू न संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रवीने एक गोल केला. मध्यंतरानंतर शाहरू खने एक गोल केला. दरम्यान, भुसावळ रेल्वे संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, अकोला संघाची मजबूत संरक्षण फळीने भुसावळ संघाचे सर्व प्रयत्न निष्फळ केले. सामन्याच्या निर्धारित क्षणापर्यंत अकोला संघाने ३-0 अशी आघाडी कायम ठेवून, उपान्त्य फेरीत प्रवेश निश्‍चित केला. अकोला संघाकडून धीरज चव्हाण, कुणाल सावदेकर यांनीदेखील चांगले खेळप्रदर्शन केले.
काल शुक्रवारी, अकोला संघाचा पहिला सामना हिंगणघाट संघासोबत झाला. अकोला संघाने हा सामना २-१ ने जिंकला. दोन्ही गोल चंदन ठाकूर याने करू न, सामना जिंकला. स्पर्धेचे आयोजन आदर्श एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँण्ड कॉर्मसच्यावतीने केले आहे. अकोला जिल्हा हॉकी संघटनेचे पदाधिकारी माजी क्रीडामंत्री अजहर हुसैन, संजय बैस, गुरू मित गौसल  रमेश शेलार आदींनी खेळाडूंचे कौतुक केले.