अकोला: कपाशी उत्पादक शेतक-यांवर आत्महत्येची पाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:14 AM2018-03-07T02:14:11+5:302018-03-07T02:14:11+5:30

तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेतकºयांनी ६ मार्चला तहसीलदार संतोष येवलीकर यांना दिले.

Akola: Suicidal shift on farmers of cotton cultivation! | अकोला: कपाशी उत्पादक शेतक-यांवर आत्महत्येची पाळी!

अकोला: कपाशी उत्पादक शेतक-यांवर आत्महत्येची पाळी!

Next
ठळक मुद्दे तेल्हा-यात तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतक-यांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेतक-यांनी ६ मार्चला तहसीलदार संतोष येवलीकर यांना दिले.
शेतकरी गेल्या तीन वर्षांच्या दुष्काळावर मात करीत असताना यावर्षी कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटून एकरी १ ते ३ क्विंटल उत्पादन झाले. शासनाने बोंडअळीचा सर्व्हे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले; पण सर्व्हे करणाºया अधिका-यांनी ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्याने हिवरखेड मंडळ व अडगाव मंडळातील ३० गावे शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहेत. 
शेतक-यांना मदत न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असे निवेदन हिवरखेड येथील भारिप-बहुजन महासंघाचे सुनील इंगळे, सुखदेव भगत, प्रा. संजय हिवराळे, प्रफुल्ल मोरे, आमद सुरतने, दीपक रायबोले, मारोती वाकोडे, मो. उमर मो. अनसोद्दीन यांच्यासह तळेगाव बु., तळेगाव खु., झरी बु., कार्ला, हिंगणी बु., हिंगणी खु., गोर्धा, कळमखेडसह २० गावातील शेतकरी उपस्थित होते.  

Web Title: Akola: Suicidal shift on farmers of cotton cultivation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.